मुंबई : सध्याच्या काळात बहुतांश नागरिकांकडे स्मार्टफोन असल्याचं पहायला मिळतं. मात्र, अनेक युजर्स हे स्मार्टफोनची बॅटरी लवकर डाऊन होत असल्याने त्रस्त असतात. तुमच्याही फोनची बॅटरी लवकर डाऊन होते आणि यामुळे तुम्ही त्रस्त झालात? तर मग तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाहीये. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी दिर्घकाळ चालण्यास मदत होईल.


वायब्रेशन टर्न ऑफ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दिर्घकाळ चालावी यासाठी सर्वातआधी फोनचं वायब्रेशन मोड टर्न ऑफ करा. वायब्रेशन ऑन असल्याने बॅटरी अधिक खर्च होते आणि बॅटरी डाऊन होते.


फोनचा बॅकग्राऊंड कलर 


तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे त्यामध्ये AMOLED डिस्प्ले आहे. तर, फोनचा बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवा यामुळे बॅटरी कमी खर्च होईल. 


ट्रॅकिंग लोकेशन


आपल्या फोनची ट्रॅकिंग लोकेशन बंद करा. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी अधिक काळ चालेल. मोबाईलमध्ये असलेले बहुतांश अॅप्स युजर्सचं लोकेशन ट्रॅक करतात आणि यामुळे बॅटरी अधिक खर्च होते.


अॅप्स अनइन्स्टॉल


तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे काही अॅप्स आहेत जे तुम्ही कधीच वापरत नाही किंवा काही कामाचे नाहीत असे अॅप्स तात्काळ अनइन्स्टॉल करा. यासोबतच ई-कॉमर्स साईटचे अॅप्सही अधिक बॅटरी खर्च करतात.