मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवरून फोटो शेअर केल्याने अनेक जण क्वालिटी खराब होत असल्याची तक्रार करतात. तर काही जण पर्याय म्हणून डॉक्युमेंट फाईलमध्ये फोटो पाठवतात. मात्र इतकं सर्व करायची काहीच गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरचा हा एक ऑप्शन तुम्ही पाठवलेला फोटो क्वालिटी खराब न होता समोरच्याला मिळेल. यासाठी या ट्रिक्स वापरा.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WhatsApp वर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस होतात, त्याची क्वालिटी खराब होते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरचा हा ऑप्शन या समस्येचे निराकारण करणार आहे. हा पर्याय  Android आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे.


'या' स्टेप्स फॉलो करा 


  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. 

  • अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जा

  • सेटिंग्जमध्ये तुम्हाला 'स्टोरेज आणि डेटा' हा पर्याय दिसेल.

  • त्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या स्क्रीनवर दिसणारा मेनू, 'मीडिया अपलोड गुणवत्ता' तळाशी दिसेल. 

  • त्यावर क्लिक करताच तुम्हाला 'ऑटो', बेस्ट क्वालिटी आणि 'डेटा सेव्हर' असे तीन पर्याय दिसतील.

  • यातून तुम्ही 'बेस्ट क्वालिटी' निवडा. हा पर्याय निवडल्यास तुम्ही शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस होणार नाहीत.