मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. ज्याचे जग भरात यूजर्स आहेत. लोकं मेसेज, फोटो किंवा माहिती पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतो. त्यामुळे आपले युजर्स दुसरीकडे कुठे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ नये म्हणून कंपनी नवीन नवीन फीटर्स अपग्रेड करत असते. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी सहजपणे कनेक्ट होण्यास मदत करते. परंचु तुम्हाला हे माहित आहे की, तुम्ही जेव्हा WhatsApp उघडता तेव्हा इतर वापरकर्ते तुमची स्थिती पाहतात. म्हणजे तुम्ही ऑनलाईन आहात का? किंवा किती वेळापूर्वी ऑनलाईन होतात हे सगळं इतरांना समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही तुमचं ऑनलाई टाईम लपवून ठेवू शकता परंतु तुम्ही जेव्हा ऑनलाईन येता तेव्हा मात्र लोकांना तुम्ही ऑनलाईन दिसणारच. मग यासाठी काय करायचं? यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. परंतु यासाठी कोणताही अधिकृत मार्ग नाही.


यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्याच्या मेसेजला रिप्लाय दिला तरी तुम्हाला त्यांचे ऑनलाइन स्टेटस दिसणार नाही. यासह तुमची गोपनीयता देखील राखली जाईल.


व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे ऑनलाइन स्टेटस लपविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घेऊ शकता पण या अ‍ॅप्समध्ये सुरक्षेचा धोका आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टीशिवाय ऑनलाइन स्टेटस लपवण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.


यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनचे नोटिफिकेशन फीचर वापरावे लागेल. म्हणजेच, जेव्हा तुम्हाला एखाद्याचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज येतो, तेव्हा तो फोनच्या नोटिफिकेशनमध्येही दिसतो. जर तुम्ही केवळ नोटिफिकेशनमधून आलेल्या मेसेजला रिप्लाय दिला तर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइन दिसणार नाही.


तुम्हाला नोटिफिकेशनवर क्लिक करून अ‍ॅप उघडण्याची गरज नाही. नोटिफिकेशनमधील व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा मेसेज लिहून पाठवू शकता. ही पद्धत आपल्याला ऑनलाइन स्थिती लपविण्यास मदत करेल.