Traffic challan rules:  रस्त्यावर गाडी चालवताना अनेक नियम पाळावे लागतात. तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याच वेळी कार किंवा बाईक (car-bike) चालवताना फोन वापरल्याबद्दल तुमचे चलन कापले जाऊ शकते. याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. पण गाडी चालवताना फोन वापरताना सापडलात, तर तुमचं चलान कापलं जाणार. (using mobile phone by bluetooth earphones illegal or not know challan rules)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतू अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, फोन नाही पण आपण गाडी चालवताना ब्लूटूथ इयरफोनद्वारे (bluetooth earphones) फोनवर बोलू शकतो का किंवा इयरफोन (earphones आपल्या कानाला लावू शकतो का? असे केल्याने चलन (challan rules) कापले जाईल का? चला याबद्दल जाणून घेऊ की तुम्ही गाडी चालवताना इअरफोन वापरू शकता की नाही?


 वास्तविक, ट्रॅफिक नियमांमध्ये (Traffic rules ) हे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही गाडी चालवताना फोन वापरू शकत नाही. परंतु बहुतेक राज्यांच्या मोटार वाहन कायद्यात ब्लूटूथ हेडफोनबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्येही वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. परंतू एका मीडिया रिपोर्टनुसार, बँगलोर ट्रॅफिक पोलिसांच्या (Bangalore Traffic Police) वेबसाइटवर या संबंधित एक नियम समोर आला आहे. जिथे स्पष्टपणे लिहिले आहे की, मोबाईल फोन व्यतिरिक्त, इयरफोन आणि ब्लूटूथ हेडसेट वापरण्यासाठी तुमचे चलन कापले जाऊ शकते. 


वाचा : Pitru Paksha: लग्नसराईसाठी महत्त्वाची बातमी, तुम्ही 'या तारखेला खरेदी करू शकता


आता हे चलान किती रुपयांपर्यंत असेल?


बँगलोर ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाइटवर असे लिहिले आहे की, "वाहन चालवताना केवळ मोबाईल फोन वापरणेच नाही तर हँड्स फ्री उपकरण (इअरफोन, ब्लूटूथ हेडसेट इ.) वापरणे देखील गुन्हा आहे. MV कायद्याच्या कलम 184(c) नुसार, कोणतीही व्यक्ती मोटार वाहन चालवताना मोबाईल फोन वापरू शकत नाही. 


तुम्हाला दुचाकी/तीन चाकीसाठी रु. 1 हजार 500 रुपये, LMV साठी 1 हजार 500 रुपये आणि इतर वाहनांसाठी 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.