नवी दिल्ली : तुम्ही पण जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या व्हॅलेंनटाईन डे ला आयफोन खरेदी करणाऱ्यांना स्पेशल ऑफर देण्यात आली आहे. ही स्कीम एचडीएफसी बॅंकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. व्हॅलेंनटाईन डे ला आयफोन खरेदी केल्यास एचडीएफसी बॅंक ७००० रुपयांचे कॅशबॅक देण्यात येणार आहे. जर तुम्ही एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला EMI ट्रांजेक्शनवर ७००० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर आयपॅड खरेदी केल्यास तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. 


९-१४ फेब्रुवारीपर्यंत आहे ही ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी बॅंकेची ही ऑफर ९-१४ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध आहे. या ऑफर दरम्यान एचडीएफसी बॅंक तुम्हाला iPhone SE, iPhone 6 आणि iPad वर कॅशबॅक देत आहे. या ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला फक्त १५,००० रुपयात आयफोन मिळेल. 


या ऑफरनंतर ही असेल किंमत


iPhone SE (32 GB) ची मार्केट प्राईज आहे २२००० रुपये. मात्र एचडीएफसीच्या ७००० रुपयांच्या कॅशबॅकमुळे आयफोन तुम्हाला फक्त १५००० रुपये मिळेल. त्याचबरोबर आयफोन 6 तुम्ही २० हजारात खरेदी करु शकता. आयफोन 6 मार्केट प्राईज आहे २७ हजार रुपये.


१५ हजारात मिळेल आयपॅड


अॅपलचे ९.७ इंच आयपॅड बाजारात २५ हजाराला उपलब्ध आहे. एचडीएफसी  बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी केल्यास १० हजार रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरमुळे तुम्हाला आयपॅड १५००० रुपयांना मिळेल.