VIP Sim Card : फुकटात मिळतोय व्हीआयपी मोबाईल नंबर, जाणून घ्या
व्हीआयपी नंबरमध्ये (VIP Sim Card) वेगळं काय असतं तर तो नंबर इतरांना सहजपणे लक्षात राहण्यास मदतशीर ठरतो.
Special VIP Number : स्टेटस म्हणून मिरवण्यासाठी अनेकांचा व्हीआयपी नंबरकडे ओढा असतो. आपल्याला व्हीआयपी मोबाईल नंबर मिळावा, यासाठी अनेकांची अधिकचे पैसे मोजायची तयारी असते. व्हीआयपी नंबरमध्ये वेगळं काय असतं तर तो नंबर इतरांना सहजपणे लक्षात राहण्यास मदतशीर ठरतो. व्हीआयपी नंबरमध्ये अनेक आकडे हे पुन्हा पुन्हा येतात. उदाहरण, 9999, 1111 किंवा 0000. व्हीआयपी नंबर मोजकेच असल्याने त्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागते. मात्र तुम्ही फुकटात व्हीआयपी नंबर मिळवू शकता ते ही घरबसल्या. घरी बसल्या फुकटात व्हीआयपी नंबर कसा मागवायचा हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (vi vodafone idea provide vip mobile number in free know process)
या कंपनीची शानदार ऑफर
व्होडाफोन-आयडिया (VI) ग्राहकांना मोफत व्हीआयपी क्रमांक देत आहे. यासाठी कोणतेही शुल्क घेत नाही. कंपनी अशा नंबरची होम डिलिव्हरीही करत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रक्रियेद्वारे आपण ते खरेदी करू शकतो. हा नंबर खूप अनोखा आहे आणि तुम्हाला तो खूप आवडेल.
असा मिळवा व्हीआयपी नंबर
जर तुम्ही स्पेशल नंबर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला फ्री फॅन्सी नंबर निवडण्याचा पर्याय मिळेल. जेव्हा तुम्ही नंबर निवडता तेव्हा तुम्हाला पोस्टपेड किंवा प्रीपेड यापैकी एक निवडावा लागेल. यानंतर घराचा पत्ता, पिन कोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. आता तुम्हाला ही प्रक्रिया ओटीपीने पूर्ण करावी लागेल. त्यानंतर सिम तुमच्या घरी पोहोचेल. या प्रक्रियेचे अनुसरण करून, आपण सहजपणे घरबसल्या सिम मिळवू शकता, जसे की आम्ही सांगितले की आपल्याला नंबर निवडण्याचा पर्याय मिळेल, त्यानंतर आपण आपल्या आवडीचे सिम खरेदी करू शकता आणि आपण अनेक पर्यायांमधून निवड करू शकता.