तुम्ही Google Map वापरताना तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? सोशल मीडियावर या फोटोची चर्चा
सोशल मीडिया साइट Reddit वर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई : गुगल मॅप ही एक खरचं कामाचं अॅप आहे, परंतु काहीवेळा लोकांना त्यात समस्या देखील येतात. कारण बऱ्याचदा गुगल मॅप आपली दिशा भूल देखील करतो. हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी आलाच असणार. परंतु गुगल मॅपमुळे आणखी एक समस्या निर्माण केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरू आहे.
अलीकडेच एका व्यक्तीने Google मॅपवर काहीतरी पाहिले जे अतिशय धक्कादायक होते. जेव्हा एका ड्रायव्हरने रस्ता पाहण्यासाठी गुगल मॅप स्ट्रीट व्ह्यू कॅमेरा (Google Map Street View Camera) उघडला, तेव्हा त्याने असे दृश्य पाहिले जे कोणालाही आश्चर्यचकित करेल.
सोशल मीडिया साइट Reddit वर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱ्यातून घेण्यात आला आहे. फोटोमध्ये, एक माणूस एका गाडीच्या वर बसून पॉटी (संडास) करत आहे. फोटोमध्ये, एक महिला आणि एक लहान मुलगी देखील त्या व्यक्तीपासून काही अंतरावर दिसत आहेत.
हा फोटो सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे. कारण असे जर असेल तर तुम्ही जे काही करत असाल त्यावर गुगल मॅपची नजर असू शकते आणि गुगल मॅपचं सॅटलाईट त्याचा प्रतिकारात्मक गोष्टी दुसऱ्यांना दाखवू शकतं जो चिंतेचा विषय़ बनु शकतो.
डेली स्टारच्या बातमीनुसार, हा फोटो अमेरिकेच्या वायोमिंगमधील बीव्हर ड्राइव्हवर (Beaver Drive) घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोक या अज्ञात व्यक्तीची खिल्ली उडवत आहेत आणि त्याला पूपी गाय (Poopy Guy) म्हणत आहेत.
एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले की, असे दिसते की जणू त्या गाडीजवळ उभी असलेली महिला हसत आहे. एका व्यक्तीला अमेरिकन शो Better Call Saul ची आठवण झाली, ज्यात असेच दृश्य होते. हा फोटो स्पष्ट नाही, त्यामुळे ती व्यक्ती कारवर नक्की काय करत आहे हे दिसत नाही.
काही लोक कमेंटमध्ये लिहित आहेत की, तो पोटी साफ करण्यासाठी नाही तर गाडीचे छप्पर ठीक करण्यासाठी चढला आहे. फोटोच्या खराब क्वालिटीमुळे आणि तो लांबून काढल्यामुळे काही स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात काय करत आहे हे अनेकांना समजत नाही.