मुंबई : तुम्हाला मोठ्या आणि फास्ट राईडसचा थरार अनुभवायला नक्कीच आवडत असेल... पण, कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळेस जास्तच सावध राहाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओहियोमध्ये घडलेल्या एका थरारक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. एका जत्रेत मोठ्ठाल्या पाळण्यांचा थरार अनुभवणं काही जणांना खूपच महागत पडलंय. 


एक मोठ्ठा आकाराचा पाळणा वेगानं आकाशात झेपावतो... आणि तितक्याच वेगानं तो पुन्हा खाली येतो... एवढ्यात त्याची धडक एका खांबाला लागते... आणि पाळणा पुन्हा आकाशात झेपावतानाच त्याचा एक भाग धाडकन खाली कोसळतो... असं दृश्यं या व्हिडिओत पाहायला मिळतंय. या घटनेत दोन जण ठार झाल्याची माहिती मिळतेय.