नवी दिल्ली : चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिओने भारतात आपला नवा स्मार्टफोन Y69 लाँच केला आहे. व्हिओ Y69 या फोनची खास बाब म्हणजे १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिओ Y69 या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच हा फोन १ सप्टेंबरपासून ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. यासोबतच हा स्मार्टफोन रिटेल स्टोअर्समध्येही विकला जाणार आहे. 


व्हिओ Y69 या फोनमध्ये ५.५ इंचाची एचडी (१२८०X७२० पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच गोरिल्ला ग्लास ३ ही देण्यात आली आहे.


स्क्रीन१.५GHz ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर ३जीबी रॅम, ३२जीबी इंटर्नल स्टोरेज, १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, मूनलाईट सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनर होम बटण, ३०००mAh क्षमतेची बॅटरी असे फिचर्स या फोनमध्ये असणार आहेत.