बिग ऑफर: Vivo मान्सून कार्निवल सुरू, फ्लिपकार्टवर २०,००० रूपयांपर्यंतची सूट
बहूचर्चीत Vivo मान्सून कार्निवलला आजपासून (२३ ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. हा कार्निवल उद्या (२४ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. दोन दिवसांच्या या कार्निवलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.
नवी दिल्ली : बहूचर्चीत Vivo मान्सून कार्निवलला आजपासून (२३ ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. हा कार्निवल उद्या (२४ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. दोन दिवसांच्या या कार्निवलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.
Vivo मान्सून कार्निवलमध्ये Vivoच्या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर उपलब्ध असणार आहे. या शिवाय गोआयबीबोचे गिफ्ट व्हाऊचर, बुकमाय शोचे मू्व्ही व्हाऊचर फ्री दिले जाणार आहे. तसेच, Vivoच्या फोन खरेदीवर १२ महिन्यांपर्यंतची नो कॉस्ट ईएमआय ऑफरही उपलब्ध आहे. नो कॉस्ट ईएमआयवर फोन खरेदी करण्यासाठी यूजर्सला क्रेडीट कार्ड वापरून फोन खरेदी करावा लागणार आहे. यासोबतच २,००० रूपयांची गोआयबीबोचे व्हाऊचर आणि ५०० रूपयांचे बुकमाय शोचे व्हाऊचर फ्री मिळणार आहेत. Vivoच्या V5s वर १०० रूपयांची सूट दिली जात आहे. तर, २००० हजार रूपयांची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफरही युजर्सला मिळणार आहे. यात १७,००० रूपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. या फोनची किंमत १७,९९० रूपये आहे. हा फोन १,५०० रूपय प्रतिमहिना अशा १२ ईएमआयवर तुम्ही खरेदी करू शकतात.
दरम्यान, Vivo Y53 वरही १,००० रूयपांची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. यावर सुमारे ९,००० रूपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तुम्हांला हा फोन खरेदी करायचा असल्यास ८३३ रूपये प्रतिमहिना अशा १२ ईएमआयवरही आपण हा फोन खरेदी करू शकता. या फोनची किंमत ९,९९० रूपये आहे. यासोबतच इतरही अनेक ऑफर्स या कार्निवलमध्ये उपलब्ध आहेत.