Vivo T1x: विवोच्या अपकमिंग स्मार्टफोन Vivo T1x प्रतीक्षा संपली आहे.  विवो कंपनीने भारतात Vivo T1x स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन भारतात 20 जुलैला लाँच होणार आहे. हा 5 जी कनेक्टिव्हिटीसह येईल.  Vivo T1x मध्ये मीडियाटेक डायमनसिटी 900 प्रोसेसर असणार आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. याचा प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vivo T1x च्या 5G प्रकारात 5,000mAh बॅटरी आहे, जी 44W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनच्या 4G प्रकारात, 5,000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. Vivo T1x च्या 5G प्रकारात कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ आणि यूएसबी Type-C पोर्ट देखील मिळेल. 



6 जीबी रॅमसह Vivo T1x 5G चे 128 GB स्टोरेज व्हेरिएंट चीनमध्ये 1,699 युआन म्हणजेच (19,900 रुपये) लाँच करण्यात आले होते. भारतातही ही किंमत समान राहण्याची अपेक्षा आहे. 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 21,300 रुपये असेल. तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत जवळपास 23,700 रुपये असेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, फोन कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.