`ही` कंपनी घेऊन येतेय सर्वात स्वस्त Smartphone
स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घ्या
मुंबई : स्मार्टफोन बाजारात दरदिवशी नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. त्याचप्रमाणे आता Vivo कंपनी आपला Vivo T1X हा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. या स्मार्टफोनची लॉंचिंगची तारीख, फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.
गेल्या अनेक दिवसांपासून Vivo T1X या स्मार्टफोनबद्दल बातम्या येत आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनची नागरीकांना उत्सुकता लागलीय. त्यातच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील मीडिया रिपोर्ट्स आणि लीक द्वारे समोर आले आहेत.
स्मार्टफोन लाँचची तारीख
सध्या स्मार्टफोन बाजारात Vivo T1X ची चर्चा आहे. हा 4G स्मार्टफोन 20 जुलै 2022 रोजी लॉन्च होत आहे आणि याची पुष्टी कंपनीकडूनच झाली आहे. या दिवशी Redmi K50i देखील लॉन्च होत आहे.
किंमत किती?
मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार, Vivo T1X 4G 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच आणखी एका रिपोर्टनुसार या फोनची किंमत 11,990 रुपये असू शकते. विशेष म्हणजे कंपनीकडून याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.
फिचर्स
Vivo T1X हा स्मार्टफोन मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच फुल एचडी + रिझोल्यूशन डिस्प्ले, 50MP मुख्य सेन्सर कॅमेरा, चांगली बॅटरी देण्यात आली आहे.