मुंबई :  तुम्ही सेल्फीचे शौकीन आहात तर दोन कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आलेय. व्हिवो V5 प्लसची किंमत ५००० रुपयांनी कमी झाली. यापूर्वी २७,९८० रुपये किंमत असलेला फोन फ्लिपकार्टवर आता २२,९९९ रुपये किमतीत खरेदी करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vivo V5 Plus भारतात लॉन्च झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात किंमत कपात झाली आहे. ही किंमत काही काळासाठी आहे की कायम स्वरुपी आहे. त्याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा सेल्फी फोन खरेदीसाठी अनेकांच्या उड्या पडल्यात.


व्ही 5 प्लसमध्ये दोन लेन्सची एकत्रीचय आहे - 20 एमएम आणि 8 एमपी. - हे सुनिश्चित करते की एक परिपूर्ण सेल्फीसाठी यंत्रासाठी आवश्यक असलेली खोली किती मोठी आहे.


प्रगत कॅमेरा तंत्रज्ञानामुळे चित्रावर क्लिक केल्यानंतर देखील फोकस जोडता येतो. वापरकर्ते प्रथम शूट करू शकतात आणि नंतर इच्छित फोकस क्षेत्र निवडू शकतात. हा स्मार्टफोन ५.५ इंचाचा पूर्ण एचडी डिस्प्लेसह उपलब्ध आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास स्क्रीनद्वारे सुरक्षित आहे.


या फोनमध्ये २.०GHzचा ऑक्टोकोर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असून याची मेमरी वाढवू शकता. फोनमध्ये ३०५५ mAh ची बॅटरी आहे. हा फोन में अॅड्रॉयड मार्शमॅलो ६.० उपलब्ध आहे.
 
या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे आहेत. एक २० मेगापिक्सलचा आणि दुसरा ८ मेगापिक्सलचा आहे. तर रिअर कॅमरा १६ मेगापिक्सल आहे. फोनला होमचे बटन फिंगरप्रिंट सेंसर आहे.  याशिवाय फोनमध्ये 4G LTE डुअल सिम सपोर्ट, Wi-Fi, Bluetooth आणि GPS उपलब्ध आहे.