लवकरच लॉन्च होणार २४ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन!
चीनची मोबाईल निर्माता कंपनी vivo भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एक नवीन स्मार्टफोन आणत आहे.
नवी दिल्ली : चीनची मोबाईल निर्माता कंपनी vivo भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एक नवीन स्मार्टफोन आणत आहे. कंपनी २० नोव्हेंबरला हा शानदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
कंपनी या स्मार्टफोनला Vivo V7 नावाने लॉन्च करणार आहे. मात्र कंपनीकडून अजून यावर काहीही अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीये. असे सांगितले जात आहे की, या स्मार्टफोनची विक्री नोव्हेंबरच्या शेवटी सुरु होईल. Vivo V7 चा डिस्प्ले चांगला असणार असे सांगितले जात आहे. असाही अंदाज आहे की, Vivo V7 हा स्मार्टफोन कंपनीने आधीच लॉन्च केलेल्या Vivo V7+चं व्हेरिएंट असणार आहे.
Vivo V7+ हा एक सेल्फी बेस्ड स्मार्टफोन आहे. यात २४ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर ५.९९ इंचाची एचडी रिझोल्यूशन असलेल्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमचा स्लॉट दिलाय. हा फोन अॅन्ड्रॉईड ७.१ नूगावर आधारित फनटच ओएस ३.२ वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबत ४ जीबी रॅम दिली आहे.
अशीही आशा केली जात आहे की, Vivo V7 मध्येही २४ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा आहे. तसेच यात बॅकला सिंगल रिअर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये बॅक फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा असू शकतं. यासोबतच यात ४जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत मिळेल.