नवी दिल्ली : चीनमधील स्मार्टफोन निर्माता किंपनी Vivo ने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Vivo V7 लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या Vivo V7 या स्मार्टफोनची विक्री केवळ फ्लिपकार्टवर होणार आहे. तर फोनची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली आहे.


24 मेगापिक्सल फ्रँट कॅमेरा


यापूर्वी हा स्मार्टफोन इंडोनेशियात लॉन्च करण्यात आला होता.या फोनची खास बाब म्हणजे यामध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे.


फिचर्स...


Vivo V7 मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉईड नुगट 7.1, 5.7  इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझॉल्युशन 720X1440 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.8GHz चा ऑक्टाकोअर क्वॉलकॉम 450 प्रोसेसर देण्यात आला आहे.



Vivo V7 मध्ये 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. तुम्ही मेमरी कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकता.


कॅमेरा


Vivo V7 या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा रियर आणि 24 मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आळा आहे. तसेच सेल्फी कॅमेऱ्यात मून लाईट ग्लो फिचरही देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth v4.2, GPS/ A-GPS, Micro-USB, FM radio आणि 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.


फोनची किंमत


या फोनची किंमत १८,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.