मुंबई : व्हिओने आणखी एक नवीन स्मार्ट फोन भारतात लॉन्च केला आहे, 'व्हिओ व्ही9 यूथ' . 'व्हिओ व्ही9 यूथ' हा फनटच ओएस 4.0 फोन आहे, (अँन्डॉईड 0.1 ओरिओ) या फोनची भारतातील किंमत १८ हजार ९९० आहे. हा स्मार्टफोन सध्या व्हिओच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच हा फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम, व्हिओ ईस्टोअरवर २४ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स विचारात घेतले तर फारच चांगले आहेत. 6.3 इंचाची फूल एचडी स्क्रीन आहे, 1080*2280 पिक्सेलची, तसेच याला कॉर्निग गोरिला ग्लास लेव्हल थ्री प्रोटेक्शन देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डुअल सीम असलेला हा फोन १५० ग्रॅम वजनाचा आहे. साईझ  154.8mm x 75.1 mm x 7.9 mm आहे.


हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे, शॅम्पेन गोल्ड आणि पर्ल ब्लॅक


या फोनला 4GB RAM आहे 32GB मेमरी आहे, तर 256GB वाढवता येत microSD कार्डने.


आर्टिफिशियल इंटिलेजन्स इंटिग्रेशन आणि दोन्ही कॅमेरे आहेत फ्रन्ट आणि रिअर कॅमेरा.


व्ही नाईन युथ बिअर्स हा डुअल रिअर कॅमेरा सेटअप असलेला फोन आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
.
या फोनच्या कॅमेऱ्याला एचडीआर सपोर्ट आहे, टच फोकस, पॅनोरमा, फेस डिटेक्शन या सेवा आहेत.


सेल्फी कॅमेऱ्याला AI इंटिग्रेशन आहे. त्यामुळे या फोनचा कॅमेरा 1080p resolution ने व्हिडीओ काढू शकतो. यासाठी फोनसोबत 3,260mAh ची बॅटरी आहे.


या फोनसोबत नवनवीन 'गेम मोड' आहे. तुम्ही यावर गेम खेळत असाल, तर मेसेज, कॉल हाईड, म्यूट करण्याची सोय आहे, ज्यामुळे तुम्हाला गेम खेळताना व्यत्यय येणार नाही. फोनला गेम कीबोर्ड देखील देण्यात आला आहे, तेव्हा तुम्हाला गेम खेळताना चॅट करता येईल.


हा फोन ऑक्टा-कोअर 1.8 GHz स्नॅपड्रॅगन, 450 SoC प्रोसेसर आहे.