Vivo Smartphone Launch In India Under 10K: मोबाईल कंपन्या एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन लाँच करत आहे. माणसांची गरज पाहून त्यात फीचर्स अपडेट करत आहेत. पण असं असलं तरी स्वस्तात मस्त फोनची प्रत्येक जण वाट पाहात असतो. बजेट फोनमध्ये सर्वच फीचर्स असतील तर महागड्या फोनची आवश्यकता नसते. आता विवो कंपनी चीनी बाजारात आपला फ्लॅगशिप X90 सीरिजचा स्मार्टफोन सादर करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही लाँच करण्यासाठी भारतीय डिव्हिजन तयारी करत आहे. या स्मार्टफोनला Vivo Y02 असं नाव असेल. हा एक बजेटच स्मार्टफोन असून लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. Vivo Y02 ची किमतीचा खुलासा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vivo Y02 Price In India


Passionategeekz च्या रिपोर्टनुसार या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर V2217 असं सांगण्यात आलं आहे. या डिव्हाइसची किंमत देशात 8449 रुपये असेल. विवोमध्ये मीडियाटेक हीलियो P22Soc असणार आहे. रॅमची क्षमता कमीत कमी 2 जीबी असेल. दुसरीकडे फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच स्टोरेज विस्तारासाठी मायक्रोएसडी कार्डही वापरता येईल. विवो एक्स्टरनल स्टोरेजसाठी 256 जीबी किंवा 512 जीबी मायक्रोएसी कार्डला सपोर्ट करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनमध्ये दोन सिमकार्ड स्लॉट असतील.


तुमचं WhatsApp अकाउंट हॅक तर झालं नाही ना! या ट्रिकनं शोधून काढा


स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला 8 एमपी आणि एलईडी फ्लॅश मॉड्यूल असेल. तसेच सेल्फीसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा असेल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल असा दावा करण्यात आला आहे. 5W किंवा 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. डिस्प्लेला 1600*720 पिक्सेल एचडी+ रिझॉल्यूशन 6.51 इंच हेलो फूल व्ह्यू आयपीएस एलसीडी असू शकते. गुगलानी के यांच्या मते फोनमद्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि आय प्रोटेक्शन मोड असेल.