तुमचं WhatsApp अकाउंट हॅक तर झालं नाही ना! या ट्रिकनं शोधून काढा

WhatsApp Account Hack: व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण व्हॉट्सअॅप अकाउंटही हॅक होऊ शकतं. जर तुमचं अकाउंट हॅक झाल्याची शंका असेल तर सोप्या स्टेप्स फॉलो करून चेक करा. 

Nov 11, 2022, 21:01 PM IST
1/5

WhatsApp Account

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही सहज शोधू शकता. आलेले मेसेज कुठेतरी वाचले जातात की नाही, हे तपासा. जर असे होत असेल तर समजून घ्या की तुमचे अकाउंट हॅक झाले आहे.

2/5

WhatsApp Account

तुमच्या whatsapp खात्यामध्ये किती खाती लिंक आहेत हे तुम्ही तपासले पाहिजे. कारण काही जण त्यांच्या फोनवर तुमचे खाते अ‍ॅक्सेस करतात. हे सहज करता येते.

3/5

WhatsApp Account

जर तुमचे खाते हॅक झाले असेल, तर लक्षात ठेवा की, कोणताही व्हिडिओ आपोआप डाउनलोड होत नाही. कारण अनेक वेळा हॅकर्स आलेले व्हिडीओ पाहत असतात आणि तुम्ही डाउनलोड करण्यापूर्वी ते डाउनलोड करतात.

4/5

WhatsApp Account

तुम्ही प्रत्येक चॅटिंग तपासले पाहिजे कारण जर हॅकर्सनी तुमची चॅट उडवली असेल तर तुम्हाला सहज कळेल. म्हणून नेहमी सर्व चॅटिंग तपासा.

5/5

WhatsApp Account

जर तुमचा मेसेज नसलेल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमधील नंबरवरून वारंवार मेसेज येत असेल तर हॅकिंगची समस्या असू शकते. कारण अनेक वेळा ते इतर नंबरवरून मेसेज करतात आणि लोकांची फसवणूक करतात.