मुंबई : वोडाफोननं त्यांचा सगळ्यात स्वस्त प्रिपेड प्लान लॉन्च केला आहे. 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लानची किंमत 279 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 250 मिनिटांचं आणि आठवड्याला 1 हजार मिनिटांचं कॉलिंग फ्री मिळणार आहे. याचबरोबर 4जीबी 3जी/4जी डेटा मिळणार आहे. काही ठराविक सर्कलमध्येच वोडाफोननं हा प्लान लॉन्च केला आहे. वोडाफोनचा हा प्लान मुंबई, कर्नाटक आणि इतर सर्कलमध्ये मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोन आणि आयडियाचं काही दिवसांपूर्वीच विलीनीकरण झालं होतं. यानंतर दोन्ही कंपन्यांचे ग्राहक 408 मिलियन एवढे झाले आहेत. विलीनीकरणानंतर वोडाफोनकडे नव्या कंपनीची 45.1 टक्के हिस्सेदारी आहे. आदित्य बिर्ला ग्रुपकडे 26 टक्के आणि आयडिया शेअरधारकांकडे 28.9 टक्के हिस्सेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांवर 1.15 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे.


नव्या सीमची गरज नाही


वोडाफोन-आयडियाच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांना नवीन सीम कार्ड घ्यायची गरज नाही. कंपनीनं त्यांच्या सिस्टिममध्येच जुन्या ग्राहकांचा डेटा अपडेट केला आहे. तसंच जुन्या नंबर आणि सिम कार्डवरच नवीन ऑफर्स सुरु केल्या आहेत.