मुंबई : देशभरात पेट्रोल कार ऐवजी इलेक्ट्रिक कारला मागणी वाढत आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यावर कंपन्यांवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे कार कंपन्या इलेक्ट्रिक कारवर काम करीत आहेत. अलिकडेच एसयूव्हीची 'कोना' ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. ही कार लॉन्च झाल्यानंतर अन्य कंपन्याही इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहेत. आता देशातील सर्वात मोठी कार निर्माती मारुती सुझुकी कंपनी (Maruti Suzuki)  तिच्या आवडत्या हॅचबॅक कार वॅगनआरची दुसरी आवृत्ती शोरुममध्ये उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती-सुझुकीची इलेक्ट्रिक वॅगनआरची चाचणीही घेण्यात आली आहे. या कारकडून कंपनीला खूप अपेक्षा आहेत. ही कार ऑटो एक्सो २०२० मध्ये लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी याशिवाय भारतातही दुसरी इलेक्ट्रिक कारची तयारी सुरु केली आहे. 'लाईव्ह मिंट'मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित झाले आहे. सुझुकी मोटार कार्पोरेशनच्या इंजिनिअरनी दुसऱ्या इलेक्ट्रिक कारसाठी एर्टिगा कॉमपॅक्ट एमपीव्हीची निवड केली आहे.   


एर्टिगाची खासगी आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये क्रेझ जास्त आहे. कंपनीचे अभियंता यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, एर्टिगा ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीबरोबर एर्टिगाची एलेक्ट्रिक व्हर्जन लोकांच्या पसंतीला उतरेल, अशी कंपनीला आशा आहे. तथापि, टोयोटाच्या सहकार्याने एर्टिगा ईव्ही बांधण्यात येत आहे किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. इलेक्ट्रिक एर्टिगा एमपीव्हीच्या आवृत्तीविषयी बोलणे अती होईल. लाइव्ह मिंटच्या मते, इलेक्ट्रिक एर्टिगा विद्यमान कारपेक्षा लांबी आणि रुंदीपेक्षा मोठी असेल.


ऑटो एक्स्पोमध्ये मारुती वॅगन आरचे इलेक्ट्रिक आवृत्ती दाखल होईल. ही कार लोकांच्या पसंतीला उतरेल. या कारची किंमत कमीत कमी ठेवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न असणार आहे. आता पेट्रोल आणि सीएनजीमध्ये कंपनीच्या कार उपलब्ध आहेत. लवकरच एलपीजी आवृत्तीत कार बाजारात येण्याची शक्यता आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार किमान १५० किमी अंतर धावेल.