Washing Machine Best Deal: वॉशिंग मशीन ही गोष्ट हल्ली प्रत्येक घरातील आवश्यक गोष्ट झाली आहे. खास करुन थंडीच्या दिवसांमध्ये हाताने कपडे धुणं फार त्रासदायक असतं. अशा दिवसांमध्ये वॉशिंग मशीन फारच फायद्याची ठरते. मात्र आजही भारतामध्ये असे अनेकजण आहेत ज्यांना वॉशिंग मशीन ही गोष्ट किंमतीच्या तुलनेत तितकीशी महत्त्वाची आणि घरी हवीच अशी गोष्ट वाटत नाही. त्यामुळेच बरेच लोक इच्छा असूनही मशीन विकत घेत नाही. मात्र तुम्ही सुद्धा केवळ किंमतीचा विचार करुन आतापर्यंत वॉशिंग मशीन घेण्यापासून स्वत:ला थांबवलं असेल ही बातमी वाचून नक्कीच तुम्ही वॉशिंग मशीन घेण्याचा विचार कराल. कारण या वॉशिंग मशीनची किंमत ही 8 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. 


एनयू 7


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनयू 7 किलो सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन 2023 च्या मॉडेलवर तब्बल 38 टक्के सूट देण्यात आली आहे. ही वॉशिंग मशीन सवलत वगळता 12 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र विशेष सवलतीनंतर या मशीनची किंमत 7990 रुपये इतकी आहे. एवढ्या कमी किंमतीला ही मशीन घरी आणता येणार आहे. ही 7 किलो क्षमतेची वॉशिंग मशीन सॉफ्ट क्लोज प्रीमियम टफ ग्लास लिडसहीत येते. या मशीनचा रंग बर्गंडी रेड आहे. यामध्ये सेमी-ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल देण्यात आला आहे.


डीएमआर


डीएमआर मॉडेल एनओ डीएमआर 30-1208 सिंगल ट्यूब टॉप लोड पोर्टेबल 3 किलो क्षमतेची 4 स्टार मिनी वॉशिंग मशीन 1.5 किलोच्या स्पीन ड्रायर बास्केसहीत येते. या वॉशिंमग मशीनवर ग्राहकांना 14 टक्के सूट दिली जात आहे. ही मशीन केवळ 5 हजार 599 रुपयांपर्यंत विकत घेता येईल. या मशीनची मूळ किंमत 6,499 रुपये इतकी आहे.


हेल्टॉन


हेल्टॉन 3 किलो सिंगल टब वॉशिंग मशीन स्पीन ड्रायरल पोर्टेबल सिंगल टब वॉशर ग्राहकांना 5,999 रुपयांऐवजी 4,799 रुपयांना उपलब्ध आहे. या मशीनवर 20 टक्के सूट मिळत आहे. यामध्ये 190 वॉटचा ड्रायर मिळतो. ही वॉशिंग मशीन इनव्हर्टरवरही काम करते.


व्हीआयएसई


व्हीआयएसई (बाय विजय सेल्स) 6.5 किलो सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 2 वॉश प्रोग्रामवर 47 टक्के सूट दिली जात आहे. या मशीनची मूळ किंमत 15000 रुपये इतकी असली तरी सवलत ग्राह्य धरल्यास ही मशीन 7990 रुपयांना उपलब्ध आहे.