You Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?
आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube.
You Tube First Video : आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube. काळानुरुप बदलणाऱ्या या (Social Media Platform) प्लॅटफॉर्मवर आजच्या घडीला असख्य व्हिडीओ आणि इतर कंटेंट शेअर करण्यात आला आहे. किंबहुना या घडीलासुद्धा युट्यूबवर कैक लाखजण काही ना काहीतरी शेअर करत असतील. मोठे व्हिडीओ (You tube videos), शॉर्ट व्हिडीओ (you tube shorts), स्टोरीज (you tube stories), थंबनेल आणि तितकेच कलात्मक हेडिंग्स. या सर्व कंटेंटचा खच युट्यूब नावाच्या या अफलातून प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. विश्वास बसणार नाही पण, प्रचंड शिक्षण घेतलेल्यांपासून अगदी चार इयत्ताही न शिकलेल्यांपर्यंत ते लहानग्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांसाठी युट्यूब उपजिवीकेचं साधन ठरलं आहे.
हेसुद्धा वाचा : झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल
काहींसाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक मोठा आधारत आहे, तर काहींसाठी एक प्रकारचं मोफत विद्यापीठ. जिथे असंख्य प्रश्नांचं निरसन केलं जातं. तुम्ही नाही म्हटलं तरी दिवसातून किमान दोनदातरी या प्लॅटफॉर्मवर जातच असाल आणि मग नकळत पुढचे कैक तास मुक्काम पोस्ट YouTube.
YouTube वर सर्वात पहिला शेअर करण्यात आलेला व्हिडीओ पाहिला?
साधारण 17 वर्षांपूर्वी युट्युबचे सहसंस्थापक जावेद करिम यांनीच या आगळ्यावेगळ्या Platform ची सुरुवात करण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. असं म्हटलं जातं की तो युट्युबचा पहिलाच व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द जावेद दिसत असून, तो San Diego Zoo मध्ये पिंजऱ्या असणारे अवाढव्य हत्ती दाखवताना दिसत आहे. Me at the zoo असं या व्हिडीओचं शीर्षक आहे.
24 एप्रिल 2005 ला शेअर करण्यात आलेल्या या व्हिजीओला आजच्या क्षणापर्यंत 249,526,176 views मिळाले आहेत. अल्गोरिदम किंवा नवी शीर्षक देण्याची पद्धत काहीही नाही, तरीही हा धुसरसा व्हिडीओ तेव्हाही खास होता आणि येणाऱ्या काळातही तितकाच खास असणार आहे. कारण हा आहे YouTube चा सर्वात पहिलावहिला व्हिडीओ.