झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल

Trending News :  ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण... 

Updated: Dec 8, 2022, 01:03 PM IST
झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल title=
spicy food leads to 4 ribs fractured and caused injuries to women latest marathi news

Trending News : धकाधकीचं आयुष्य आणि त्यामध्येही शारीरिक सुदृढतेकडे असणारा सर्वांचा कल पाहता सध्याची पिढी नेमकी कुठे वाटचाल करतेय, हेच लक्षात येत आहे. पण, फिटनेसच्या (Fitness) नादात केलेल्या चुकासुद्धा अनेकांनाच महागात पडताना दिसत आहेत. अती प्रमाणात व्यायाम करणं, खाण्यापिण्याच्या सवयी सतत बदलत राहणं हे किती धोकादायक असू शकतं हेच एका महिलेसोबत घडलेल्या प्रकारावरून लक्षात येत आहे. (China) चीनमध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं कारण, जेवता जेवता एकाएकी तिच्या चार बरगड्याच तुटच्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

झणझणीत खाणं की गरजेपेक्षा जास्त बारीक असण, कशामुळं ओढावलं हे संकट?

चीनमधील स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार शांघाय प्रांतात राहणाऱ्या हुआंग नावाच्या या महिलेनं काही दिवसांपूर्वी तिखट / झणझणीत पदार्थ खाल्ला होता. त्याचवेळी ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण, काही वेळानंतर जेव्हा बोलण्यास आणि श्वास घेण्यास अडचण जाणवू लागली तेव्हा मात्र तिनं डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. (spicy food leads to 4 ribs fractured and caused injuries to women latest marathi news )

हेसुद्धा वाचा : 20 की 55? याच्याकडे पाहून वयाचा अंदाजच लावता येणार नाही

डॉक्टरांच्या सांगण्यावरून या महिलेनं सिटीस्कॅन केलं आणि त्यामध्ये जी माहिती समोर आली ते पाहून तिच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण, या महिलेच्या 4 बरगड्या एका अनपेक्षित घटनेमुळं तुटल्या होत्या. हे सर्व खोकल्याच्या अटॅकमुळं म्हणजेच सतत खोकला येत असल्यामुळं झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं. ज्यानंतर या महिलेवर संबंधित उपचारही करण्यात आले. 

कमी वजन असण्याचा असाही फटका... 

सदर महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं वजन अतिशय कमी होतं. तिची उंची 5 फूट 6 इंच, तर वजन अवघे 57 किलो होतं. सर्वसाधारणपणे हे प्रमाण कमीच होतं. तिच्या बरगड्याही स्पष्टपणे दिसत होत्या ज्यामुळं हे संकट ओढावलं. दरम्यान, हुआंगवर योग्य वेळी उपचार झाल्यामुळं आता ती पुन्हा एकदा पुर्वीसारखं आयुष्य जगू शकेल.