इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर का लिहिले जाते CE? पुढच्या वेळी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
आज आम्ही याबाबत खास माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून फायदाच होईल.
मुंबई : जेव्हाही आपण एखादे इलेक्ट्रॉनिक उत्पादन घेतो तेव्हा, ते पॅकिंगमध्ये येते, तसेच त्यावर युजर मॅन्यूअल देखील असते. मग तो फोन असो, पंखा असो, एसी असो किंवा टीव्ही. प्रत्येक उत्पादनावर अनेक प्रकारची माहिती लिहिलेली असते. पण जवळपास प्रत्येक उत्पादनावर 'CE' असा टॅग लिहिलेला असतो. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना हे जाणून घेण्याची फारशी इच्छ नसते.
परंतु आज आम्ही याबाबत खास माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून फायदाच होईल.
हे चिन्ह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मागील बाजूस असते
तुमचा मोबाईल चार्जर असो किंवा लॅपटॉप चार्जर, त्या सर्वांवर CE चिन्ह असते. वास्तविक हा एक विशेष टॅग आहे. याचा अर्थ काय ते जाणून घेऊया...
ते कधी सुरू झाले?
युरोपियन देशांमध्ये, 1985 पासून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागील बाजूस हे CE चिन्ह लागू केले गेले. जरी पूर्वी हे चिन्ह CE ऐवजी EC असायचे. याचा अर्थ 'कॉन्फॉर्माइट युरोपियन.'
ही खूण का केली जाते?
उत्पादनावर या चिन्हाची उपस्थिती म्हणजे हे उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीने युरोपच्या मानकांची काळजी घेतली आहे. खरे तर युरोपमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी काही मानके ठरवून दिली आहेत. जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी 'लो व्होल्टेजचे नियम, सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण'.
CE लिहिलेल्या सर्व गोष्टी या मानांकनाला विचारात घेऊन बनवल्या गेल्या आहेत, असे म्हणायला काहीही हरकत नाही
या चिन्हाचा अर्थ असा आहे की, कंपनी या चिन्हासह उत्पादन कायदेशीररित्या बाजारात विकू शकते आणि अशी उत्पादने इतर देशांमध्ये निर्यात देखील केली जाऊ शकतात.