What is CrowdStrike: Microsoft ठप्प पडल्याने जगभरात हाहाकार माजला आहे. विमानांपासून ते बँका आणि स्टॉक एक्स्जेंजवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कॉन्फिग्रेशनमधील एका बदलामुळे, जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला असल्याचं बोललं जात आहे. सेवा ठप्प होण्यासाठी CrowdStrike जबाबदार धरलं जात आहे, ज्याच्या एका अपडेटमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. CrowdStrike ही एक अमेरिकन सायबर सेक्युरिटी कंपनी आहे. यामुळेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जगभरातील मायक्रोसॉफ्ट सेवांवर परिणाम झाला आहे. 


CrowdStrike नेमकं काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CrowdStrike ही एक अमेरिकन सायबर सेक्युरिटी कंपनी आहे, जी कंपन्यांना आयटी सुरक्षा प्रदान कऱण्याचं काम करते. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास इंटरनेच्या मदतीने काम करणाऱ्या कंपनीला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्याचं काम CrowdStrike करते. 


याचं मुख्य काम कंपन्यांना हॅकर्स, सायबर हल्ला, डेटी लीकपासून वाचवणं आहे. यामुळे या कंपनीने जगभरातील प्रमुख मोठ्या बँक, विद्यापीठं आणि सरकारी यंत्रणा ग्राहक आहेत. नुकतंच सायबर जगात मोठे बदल झाले आहेत. हॅकर्सकडून हल्ले वाढल्याने अनेकजण CrowdStrike सारख्या कंपन्यांवर अवलंबून आहेत.


CrowdStrike चा वापर कशासाठी होतो?


या कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी CrowdStrike Falcon एक आहे. कंपनीनुसार, CrowdStrike Falcon युजर्सना रिअल टाइम सायबर हल्ल्याची माहिती देतो. यासह हायपर अॅक्यूरेट डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक प्रोटेक्शन ऑफर करते. 


हजारो कंपन्या याचा वापर करतात. शुक्रवारी सर्व्हरमध्ये एक क्रॅश झाल्याने जगभरात मायक्रोसॉफ्टच्या सेवेत समस्या झाली आहे असं मानलं जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला CrowdStrike ने आपल्या Falcon प्रोडक्टसाठी एक अपडेट जारी केलं होतं. 


कोण आहे CrowdStrike चा मालक?


McAfee चे माजी कर्मचारी George Kurtz यांनी 2012 मध्ये ही कंपनी सुरु केली. या कंपनीचा कोणी एक मालक नाही. अनेक खासगी गुंतवणूकदार, संस्था आणि रिटेल यात भागीदार आहेत. त्याचा 40 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहे, तर 57 टक्के हिस्सा सार्वजनिक कंपन्या आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे आहे. त्याचा सर्वात मोठा वाटा व्हॅनगार्ड ग्रुपचा आहे, जो एक अमेरिकन गुंतवणूक फंड आहे. त्यांच्याकडे कंपनीचा 6.79 टक्के हिस्सा आहे.