मुंबई : आजच्या काळात, असे अनेक धोकादायक ऑनलाइन घोटाळे समोर आले आहेत, जे खूप हानिकारक आहेत. तसे पाहाता लोक आता हुशार झाले आहेत, ज्यामुळे ते कोणत्याही घोटाळ्यामध्ये अडकत नाही. परंतु असे असले तरी, हे घोटाळेखोर आणखी हुशार झाले आहेत. ज्यामुळे ते लोकांना फसवण्याचे वेगवेगळे कारणं शोधून काढतंच असतात. यातील एक घोटाळा म्हणजे सिम स्वॅप स्कॅम, ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. हा घोटाळा कसा केला जातो, त्याचे तोटे काय असू शकतात हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


सिम स्वॅप स्कॅम म्हणजे काय?


सिम स्वॅप स्कॅमला आजकाल खूप वेग आला आहे आणि तुमचे बँक खाते लुटण्याचा हा एक सामान्य मार्ग बनला आहे. सिम स्वॅप स्कॅममध्ये, हॅकर्स तुमच्या सिम कार्डची डुप्लिकेट बनवून घेतात आणि त्यासोबत तुमचा डेटा आणि बँक खात्यातील पैसे चोरले जातात.


सिम स्वॅप स्कॅम कसा काम करतो?


हॅकर्सना तुमच्या सिमची कॉपी कशी मिळते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, साध्या फिशिंग तंत्राच्या मदतीने तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी, वाढदिवस इ. तुमच्या मोबाइल ऑपरेटरशी संपर्क साधून, हॅकर्स त्याच नंबरवर नवीन सिम घेतात आणि सिम स्वॅप स्कॅम करतात.


स्मार्टफोनमध्ये सिग्नलचा अभाव


आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्यासोबत सिम स्वॅप स्कॅम झाल्याचा हा पहिलाच सिग्नल आहे. ज्यामध्ये तुमच्या फोनचं सिग्नल सारखं जाऊ लागतं किंवा कमी होतं.असे होत असल्यास तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करा आणि तुमचे सिम बंद करा


स्मार्टफोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा


हे किंवा यासारखे इतर घोटाळे टाळण्यासाठी तुमचा स्मार्टफोन काळजीपूर्वक वापरा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि तृतीय-पक्ष अॅप्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा आणि तपासा.


अशा मेसेज आणि मेल्सपासून सावध राहा


आम्ही तुम्हाला सांगतो की आकर्षक ऑफर आणि डिस्काउंटच्या रूपात तुम्हाला अनेक मेसेज आणि मेल्स मिळतात जे पाहण्यास अगदी खरे वाटतील. अशा ईमेल आणि मजकूरांपासून दूर राहा आणि त्यावर क्लिक करू नका, ते फिशिंग हल्ल्याचे माध्यम असू शकतात.