विवाहित महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? पाहून बसेल धक्का
गुगलवर आपण काय सर्च करतो याची हिस्ट्री जरी क्लिअर करता येत असली तरीही ही माहिती एकत्रितरित्या मात्र संग्रहित होते
मुंबई : प्रश्न, शंका किंवा काहीही असो हा Google नावाचा सोबती आपल्यासोबत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या आहेत. गुगलवर आपण काय सर्च करतो याची हिस्ट्री जरी क्लिअर करता येत असली तरीही ही माहिती एकत्रितरित्या मात्र संग्रहित केली जाते. यातूनच काही धक्का देणारी आकडेवारीही समोर येते.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण प्रत्येक वयोगटानुसार आणि प्रत्येक लिंगानुसार व्यक्ती गुगलवर बऱ्याच विषयांवरील माहिती सर्च करत असतात.
जिथं तरुणींचा गुगल सर्चसाठीचा विषय वेगळा असतो. तिथंच, विवाहित महिलासुद्धा गुगलवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असतात. (What married woman search on google read details )
एखादी व्यक्ती गुगलवर काय सर्च करते हे त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, राहणीमान यावरही अवलंबून असतं. पण, विवाहित महिलांच्या सर्वसमावेशक वर्गात या महिला नेमकं काय सर्च करतात असा प्रश्न केला असता काही लक्षवेधी उत्तरं समोर येतात.
काय सर्च करतात विवाहित महिला?
- पतीच्या आवडीनिवडींबाबत कसं ओळखावं?
- पतीचं मन कसं जिंकावं?
- नव्या कुटुंबात कसं मिसळावं?
- पतीच्या साथीनं कुटुंबाची जबाबदारी कशी घ्यावी?
- बाळाच्या जन्माचा निर्णय कधी घ्यावा?
- आपला मनमानी कारभार कसा चालवावा?
- पतीला मुठीत कसं ठेवावं?
असं म्हणतात की, कोणाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं फारच कठीण. त्यामुळं काही महिला वरील मुद्द्यांवर सर्च करत असतील किंवा नसतीलही. तुम्ही असं काही सर्च करता का?