मुंबई : कारने प्रवास करताना, आपण नेहमी सुरक्षित प्रवास करावे असेच लोकांना वाटत असते. बरेच लोक त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कारने प्रवास करणे पसंत करतात. परंतु बऱ्याच वेळा लोक वाहनाची सर्विसिंग किंवा किरकोळ दुरुस्ती करत नाहीत आणि अशीच कार घेऊन ते लाँग ड्राईव्हला जातात. परंतु काही वेळा लोकांचं नशीब इतकं खराब असतं की, तेव्हाच त्यांच्या गाडीचा काही ना काही प्रॉब्लम समोर येतो. ज्याचा परिणाम अत्यंत धोकादायक असू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.


पहिला उपाय म्हणजे घाबरुण जाऊ नका. तुम्हाला धाडसांने काम करावे लागेल कारण तुमच्यासह तुमच्य़ा मित्र परिवाराचे आयुष्य देखील तुमच्या हातात आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरून जाऊन वेगवान वाहनाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर जाऊन धडक देऊ नये.


म्हणजेच, टक्कर देऊन कार थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, ब्रेक फेल झाल्याचे समजताच गिअर्स बदलणे सुरू करा. म्हणजेच, तुम्ही ते पाचव्यावरुन चौथ्या, नंतर तिसऱ्या आणि शेवटी पहिल्या गिअरवर हळूहळू आणा. असे केल्याने तुमच्या कारच्या गती लक्षणीय फरक पडेल आणि तुमच्या कारची गती कमी होईल.


रिव्हर्स गियरची चूक करू नका


जोपर्यंत तुम्ही गेअरला पहिल्या गेअरवर आणत नाही तोपर्यंत ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करा परंतु तुमचा पाय एक्सीलरेटरपासून दूर ठेवा. कारण असे केल्याने तुमच्या कारचे ब्रेक लागू शकतात. ते खराब झाले असतील तर जास्त स्पीडमध्ये कार ला रोखण्यात असमर्थ असतील परंतु कमी स्पीडमध्ये ते कारला थांबवू शकतात.


पण लक्षात ठेवा की, घाबरल्याने किंवा घाईत वाहनाचे गेअर रिव्हर्समध्ये टाकण्याची चूक करू नका, कारण असे झाल्यास गाडीचा तोल बिघडल्याने अपघाताची शक्यता वाढेल.


पार्किंग दिवे आणि हॉर्न चालू करा


वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास, टॉप गिअर वरून म्हणजे पाचव्या ते पहिल्या गेअरवर वाहन आणताना पार्किंग दिवे चालू ठेवा. या दरम्यान, तुम्ही सतत हॉर्न वाजवत रहा जेणेकरून आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांना धोक्याची कल्पना येईल.


जास्त वेगाने इंजिन बंद करू नका


जेव्हा कार दुसऱ्या किंवा पहिल्या गिअरमध्ये येते, तेव्हा गाडीला खडबडीत ट्रॅकवर न्या आणि इंजिनला बंद करा. असे काम करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला वालुकामय जागा असल्यास ती निवडा. जर तुम्ही महामार्गावर असाल, तर कार दुभाजकावर घासून चालवा, यामुळे वेग खूप कमी होऊ शकतो.


लक्षात ठेवा की, तुम्हाला कार जास्त वेगात असताना त्याचे इंजिन बंद करण्याची गरज नाही, कारण असे केल्याने तुमच्या कारचे स्टीयरिंग लॉक होईल आणि तुम्ही ते चालू करू शकणार नाही. जेव्हा कारचे इंजिन मंद गतीने बंद केले जाते, तेव्हा ते काही अंतरावर गेल्यानंतर सुरक्षित मोडमध्ये थांबते.


काळजीपूर्वक हँड ब्रेक वापरा


जर तुमची कार जुनी असेल तर तुम्ही ब्रेक फेल झाल्यास हँड ब्रेक वापरू शकता.  परंतु लक्षात ठेवा की, कमी वेगात कार असल्यावरच हँड ब्रेकचा वापर करा. हाय स्पीड हँड ब्रेक मागील चाकांना जाम करू शकेल. हँडब्रेक्स सहसा तांत्रिकदृष्ट्या आधुनिक कारमध्ये किंवा इतर विविध कारणांमुळे चालत्या कारमध्ये काम करत नाहीत. परंतु जर तुमची कार थोडी जुनी असेल तर ते नक्कीच काम करतील आणि धोका टाळण्यासाठी देखील उपयुक्त ठरतील.


अपयशाचे मुख्य कारण


योग्य वेळी कारची सर्विसिंग न झाल्यामुळे काही तांत्रिक बिघाड होऊ शकतात.  ब्रेक फ्लुईड ऑइल, ब्रेक पॅड, कॅलिपर आणि ब्रेक मास्टर मधील प्रोब्लम्स आपल्या लगेच कळणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही वेळोवेळी तुमच्या कारची सर्विसिंग करा. ज्यामुळे कार एक्पर्टना हे प्रॉब्लम्स लगेच कळतील. कोणत्याही प्रकारचा ब्रेकचा आवाज येत असल्यास तुमच्या मेकॅनिककडून त्वरित ब्रेक तपासून घ्या, ज्यामुळे तुमचा अपघात टाळू शकतो.