सॅन फ्रान्सिस्को : व्हॉट्सअॅप त्यांच्या पुढच्या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिनना जास्त अधिकार द्यायची शक्यता आहे. येणाऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपचे ग्रुप अॅडमिन ग्रुपमधल्या इतरांचे टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ, डॉक्युमेंट्स आणि व्हॉईस मेसेज रोखू शकतात, अशी माहिती व्हॉट्सअॅपबिटा इन्फोनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिस्ट्रिक्टेड ग्रुप सेटिंग फक्त ग्रुप अॅडमिनच ऍक्टिव्हेट करू शकतील. ग्रुप अॅडमिन नेहमीप्रमाणेच ग्रुपवर चॅट करता येणार आहे. पण ग्रुपमधल्या इतर मेंबर्सना अॅडमिन रोखू शकणार आहे.


अॅडमिननं एखाद्या मेंबरला रिस्ट्रिक्ट केलं तर त्याला ग्रुपवर मेसेज पाठवताना मेसेज अॅडमिन असा मेसेज येईल. यानंतर हा मेसेज अॅडमिनला जाईल. अॅडमिननं हा मेसेज अप्रुव्ह केल्यानंतरच ग्रुपवर हा मेसेज शेअर होईल.