मुंबई : व्हॉट्सअॅप युजर्सला लवकरच आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने एकत्र ४ युजर्ससोबत व्हि़डिओ कॉलिंगची सुविधा लॉन्च केली होती. फेसबूकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवर आता आणखी एक नवं फीचर अॅड होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये लोकं घरीच आहेत. त्यामुळे कोणाची भेट होऊ शकत नाहीये. त्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणाक व्हि़डिओ कॉलिंगचा वापर करत आहेत. सध्या एकत्र ४ लोकांना व्हिडिओ कॉलिंग करता येत आहे. पण लवकरत व्हॉट्सअॅप एकसोबत ८ लोकांना व्हिडिओ कॉल करता येईल अशी सुविधा देणार आहे. बीटी व्हर्जनमध्ये ही सुविधा सुरु झाली असून लवकरच इतर युजर्सला देखील ही सुविधा मिळणार आहे.


८ जणांमध्ये व्हिडिओ कॉलची सुविधा सुरु झाल्यानंतर अनेक कंपन्या देखील याचा वापर करु शकतील. बाजारात सध्या झूम अॅप, गुगल डूओच्या माध्यमातून अनेक लोकांसोबत जुडता येतं. पण आता व्हॉट्सअॅपवर देखील ही सुविधा सुरु झाल्यास लोकं याचा मोठ्या प्रमाणात वापर करतील. जगात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या अनेक कोटींमध्ये आहे. भारतात देखील व्हॉट्सअॅप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे आपल्या युजर्सला आणखी आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही नवी सुविधा आणण्याचा निर्णय घेतला आहे.