WhatsApp युजर्स सावधान! असं केल्यास अचानक बंद होऊ शकते तुमचे अकाउंट
व्हाट्सऍप आज जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ऍप आहे. मागील काही काळापासून व्हाट्सअपने नवीन अपडेटच्या माध्यमातून अनेक फीचर्स दिले आहेत.
नवी दिल्ली : व्हाट्सऍप आज जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ऍप आहे. मागील काही काळापासून व्हाट्सअपने नवीन अपडेटच्या माध्यमातून अनेक फीचर्स दिले आहेत. परंतु काही युजर्स व्हाट्सअपचा चुकीचा वापर करतात त्यामुळे व्हाट्सअपला युजर्सचे अकाउंट बंद करण्याचा गंभीर निर्णय घ्यावा लागतो. कोणत्या कारणांमुळे व्हाट्सअप युजर्सचे अकाउंट बंद होऊ शकते. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
सोशल मीडिया ऍपचे अनेक फेक आणि अनधिकृत वर्जन्स मार्केटमध्ये येत आहेत. हे ऍप असे फीचर्स देतात की, ते व्हाट्सअपच्या अधिकृत वर्जनमध्ये उपलब्ध नाही. 'व्हाट्सअप प्लस' असंच एक अनधिकृत ऍप आहे. जे अनेक लोक वापरतात.
जर तुम्ही हे ऍप वापरत असल्याची माहिती व्हाट्सअपला मिळाली तर तुमचे अधिकृत व्हाट्सअपचे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते.
इतर कारणे
तुम्ही व्हाट्स ऍप प्लसचा वापर करीत नसाल तरी, तुमचे व्हाट्सअप अकाउंट बंद होऊ शकते. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्हाट्सअप मॅसेज फॉरवर्ड करीत असाल तर, तुमच्या अकाउंटवर अनेक युजर्स रिपोर्ट करू शकतात. त्यामुळे व्हाट्सऍप तुमचे अकाउंट बंद करू शकते. नुकतेच ऑगस्ट महिन्यात व्हाट्सऍपने 20 लाखाहून अधिक अकाउंट बॅन केले होते.