व्हॉट्स अॅपवर टेक्स्ट स्टेटसही होणार रंगीत !
रोज किमान १०० करोड युजर्स व्हॉट्स अॅप या मॅसेजिंग अॅपचा वापर करतात. वाढती लोकप्रियता पाहता कंपनीनेदेखील त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता मोबाईलप्रमाणेच डेक्सटॉपवरही व्हॉट्स अॅप वापरताना स्टेटस फिचर रोलआऊट करणं शक्य होणार आहे. म्हणजेच शब्दांचा रंग थोडाफार बदलून त्यांना अधिक आकर्षक करता येणार आहे.
मुंबई : रोज किमान १०० करोड युजर्स व्हॉट्स अॅप या मॅसेजिंग अॅपचा वापर करतात.
वाढती लोकप्रियता पाहता कंपनीनेदेखील त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता मोबाईलप्रमाणेच डेक्सटॉपवरही व्हॉट्स अॅप वापरताना स्टेटस फिचर रोलआऊट करणं शक्य होणार आहे. म्हणजेच शब्दांचा रंग थोडाफार बदलून त्यांना अधिक आकर्षक करता येणार आहे.
इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणेच आता व्हॉट्स अॅपवरही हे फीचर मिळणार आहे. त्यामुळे कंपनी त्यांच्या युजर्सना मेलेजिंग प्लॅटफॉर्मसोबतच जोडू इच्छिते. स्टेट्समध्ये आता छोटासा व्हिडीओदेखील ठेवणं शक्य होणार आहे. मोबाईप्रमाणेच डेस्कटॉपवरही व्हॉट्स अॅप स्टेट्स केवळ तुमच्या कॉन्टक्ट्ससोबतच शेअर करणं शक्य होणार आहे. तसेच हे केवळ २४ तास दिसणार आहे.
बिटा टेस्टींग नंतर आता व्हॉट्स अॅपने एन्ड्रॉईड तसेच आईओएस अॅपवरही कलर फूल टेक्स्टचा पर्याय दिला आहे. तुमचं अॅप ऑटो अपडेट नसेल तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन त्याला अपडेट करणं शक्य होणार आहे.
आय फोनच्या युजर्ससाठी एक खास 'पेन आयकॉन' देण्यात आला आहे. त्यानुसार, फॉन्ट सिलेक्ट करून इमोजी, बॅकग्राऊंड कलर हे ऑप्शन उपलब्ध होणार आहेत.
स्टेट्स लिहल्यानंतर आणि त्यामध्ये बदल केल्यानंतर टेक्स स्टेट्स पाठवण्यासाठी ग्रीन अॅरोवर क्लिक करा. यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट्ससाठी स्टेट्स पब्लिश होईल.