नवी दिल्ली : व्हॉटसअपनं आता चॅटिंग आणखीन मजेशीर बनवण्यासाठी एक नवा फंडा वापरलाय... ही मजा पाहण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉटसअप अपडेट करावं लागणार आहे. या अपडेटसोबत तुम्ही तुमच्या फ्रेंडस आणि कुटुंबीयांना फेसबुकप्रमानेच स्टीकर्स पाठवू शकाल... हे स्टीकर्स आयओएस आणि अॅन्ड्रॉईड दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध असतील. एकदा डाऊनलोड केल्यानंतर ते तुम्हाला ऑफलाईनही वापरता येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे स्टीकर्स अॅन्ड्रॉईड बीटा वर्जन २.१८.३२९ वर आणि आयफोन वर्जन २.१८.१०० वर उपलब्ध असतील, असं व्हॉटसअपनं एका ब्लॉग पोस्टवर म्हटलंय. 


व्हॉटस्पच्या या नव्या स्टीकर्स फिचरमध्ये तुम्हाला १२ स्टीकर्सचा एक पॅक मिळेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैंकी तुमचा आवडता पॅक डाऊनलोड करू शकता. व्हॉटसअपनं हे फिचर वापरण्यासाठी एक वेगळं स्टीकर स्टोअर दिलंय 


हे स्टीकर्स तुम्हाला चॅटिंगमध्येच चॅटबारवर इमोजी आयकॉनसोबत मिळतील... पण, यासाठी अगोदर तुम्हाला व्हॉटसअप अपडेट करावं लागणार आहे.