मुंबई : मेटा कंपनीचे सीइओ मार्क झुकरबर्गनं (Mark Zuckerberg) यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या ( Whatsapp ) नव्या फिचरची घोषणा केलीय. या नव्या फिचरमुळे टायपिंगच्या त्रासातून सुटका होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातलं सर्वांचं फेव्हरेट चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपबाबत महत्त्वाची बातमी आहे. सध्या चॅटिंगसह अ‍ॅपमध्ये डिपी सेट करणे, मेसेज पाठवणे, स्टेटस अपलोड करणे, व्हिडीओ - फोटो पाठवणे हे फिचर्स वापरण्यात येत आहेत.


परंतु, आता नव्या फिचर्समध्ये इमोजीद्वारे रिअ‍ॅक्शन्स देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय. व्हॉट्सअ‍ॅपच्या या आधीच्या व्हर्जनमध्ये फक्त चॅटिंग करताना इमोजी वापर करू शकत होतो. पण, आता आलेल्या मेसेजला रिअ‍ॅक्शन देऊ शकणार आहात.


मार्कनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये थम्स-अप, हार्ट, लाफिंग, सरप्राइज, सॅड आणि नमस्कार अशा सहा इमोजी दिसत आहेत. या इमोजी Android च्या बीटा व्हर्जन 2.22.8 वर पहिल्यांदा दिसतील. तर, अ‍ॅप अपडेट केल्यानंतर युजर्सना हे इमोजी मिळतील. 


या इमोजी वापरण्यासाठी आधी तुमचे व्हॉट्स-अ‍ॅप अपडेट करा. अपडेट केल्यानंतर व्हॉट्स-अ‍ॅप उघडा. ज्या संदेशला प्रतिक्रिया द्यायची आहे, तो संदेश निवडून काही सेकंद तो संदेश दाबून ठेवल्यानंतर या 6 इमोजी दिसतील. त्यापैकी कोणत्याही एकावर क्लिक करून तुम्हाला रिप्लाय देता येईल.