व्हॉट्सअॅपच्या या यूझर्ससाठी आलेत दोन नवे फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट
हे नवे फीचर व्हॉट्सअॅपच्या २.१७.८१ व्हर्जनमध्ये देण्यात आलंय. हे अॅप स्टोरमध्ये उपलब्ध आहे. नव्या यूट्यूब फीचरमध्ये तुम्ही चॅटदरम्यान यूट्यूबचे व्हिडीओ पाहू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही व्हिडीओ बघत असताना दुसऱ्या चॅटबॉक्समध्येही जाऊ शकता.
काय आहेत फीचर्स?
दुसरे फीचर हे व्हॉईस मेसेज बाबत आहे. या नव्या लॉक व्हॉईस मेसेज फीचरमध्ये आता मोठ्या व्हॉईस मेसेजसाठी मेसेज बटनला होल्ड करुन ठेवण्याची गरज नाही. यासाठी युझरला व्हॉईस मेसेज आयकॉनला होल्ड करुन वरच्या दिशेला स्वाईप करावे लागेल. यामुळे व्हॉईस मेसेज लॉक होईल.