मुंबई : देशात जितक्या गतीने डिजीटल पेमेंट वाढत चाललेत, तितक्याच गतीने डिजिटल फ्रॉडच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे आता डिजीटल चोर चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाले असून लोकप्रिय सोशल अॅप्सना टार्गेट करत नागरीकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे तूम्हाला जर या फ्रॉडपासून तूमचा बचाव करायचा आहे, तर ही बातमी तूमच्यासाठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सध्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये मिळेल. या व्हॉट्सअॅपचं वाढत क्रेझ पाहता डिजिटल चोरांनी आपला मोर्चा व्हॉट्सअॅपकडे वळवलाय. व्हॉट्सअॅपवर आमिष देणारे मेसेज करत नागरीकांना लुटण्याचा प्रकार सुरु आहे. हे मेसेज तुम्हाला कोणत्याही माध्यमातून पाठवले जातील, म्हणजेच आरोपी बॅकर्स, एजंट म्हणून तूम्हाला मेसेज करूव लूबा़डू शकतो.


 'या' नंबरपासून रहा सावधान
व्हॉट्सअॅपवरून लुबाडण्यासाठी अनेक प्रकारचे मेसेज केले जातात.  सध्या +92 306 0373744 वर, या क्रमांकावरून वापरकर्त्यांना लॉटरी जिंकल्याचा संदेश पाठवला जातोय. या संदेशासोबत व्हॉईस नोटही पाठवली जात आहे. हे संदेश खरे दिसण्यासाठी, घोटाळेबाज अमिताभ बच्चन यांची छायाचित्रे आणि कौन बनेगा करोडपती म्हणजेच KBC चे नाव वापरत आहेत. त्यामुळे अशा मेसेजेस पासून सावध रहा.  


मेसेजमध्ये काय लिहिलेले असते ?


असंख्य लॉटरीच्या भूलथापांना बळी पडतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर सुद्धा असेच मेसेज केले जातात. मेसेजमध्ये तुम्ही २५ लाखांची लॉटरी जिंकली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात लगेच जमा होतील असे लिहिले आहे. इतकेच नाही तर ज्या मेसेजवर तुम्हाला कॉल करायचा आहे त्यात '07666533352' हा नंबर देण्यात आला आहे. मेसेजसोबत एक ऑडिओ नोटही दिली जात आहे ज्यामध्ये तुम्ही लॉटरीचे पैसे तुमच्या बँक खात्यात कसे ट्रान्सफर करू शकता हे सांगितले जाते.या मेसेजला रिप्लाय देणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे अशा अनोळखी मेसेजेसला रिप्लाय देणे टाळा.  


मेसेज आल्यास काय कराल ? 
जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला असेल किंवा हा मेसेज तुम्हाला फसवण्यासाठी पाठवला गेला असेल असे वाटत असेल तर सर्वप्रथम तो नंबर ब्लॉक करा. जर तुम्हाला गैर-भारतीय क्रमांकावरून संदेश आला तर त्यावर विशेष लक्ष द्या आणि उत्तर देऊ नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि तुमच्या फोनवर मिळालेला OTP कोणाशीही शेअर करू नका. तसेच, जर असे मेसेज तुमच्याकडे आले तर ते इतर कोणालाही फॉरवर्ड करू नका.