सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : व्हॉटसअॅपचा वापर करणाऱ्यांनो सावधान, व्हॉट्सअॅप ग्रूप अॅडमिन सावधान...  मुंबईतल्या माटुंग्यामध्ये पोलिसांनी एका व्हॉटसअॅप अॅडमिनला अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुश्ताक अली गुलाम वारीस शेखला पोलिसांनी अटक केलीय... या महाशयांनी सप्टेंबर महिन्यात XXX (ट्रिपल एक्स) नावाचा एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. त्यात एका अनोळखी महिलेला अॅड केलं. या ग्रूपमध्ये अश्लील व्हिडिओ पाठवले जायचे... जेव्हा महिलेने हा ग्रुप बघितला तेव्हा तिला धक्काच बसला. 


त्यानंतर या महिलेनं थेट पोलीस ठाणं गाठलं... त्यानंतर या ग्रुपच्या अॅडमिनला वांद्र्यातून अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिलीय. 


आरोपीचा नंबर मिळाल्यानंतर त्याला अटक करणे पोलिसांसाठी कठीण नव्हतं.