मुंबई : प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या आणि रोज वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लवकरच यूजर्सच्या भेटीला येणार आहे. या नव्या फिचरमुळे कुटुंब मात्र खुश होऊ शकतं. व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप कॉलिंगचं फिचर लॉन्च करणार आहे. फेसबूकच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. याचबरोबर फेसबूकमध्येही काही बदल करण्यात आल्याचं झुकेरबर्ग यांनी सांगितलं. फेसबूकमध्ये आता क्लिअर हिस्ट्री आणि डेटिंग सर्व्हिसच्या सुविधा जोडण्यात आल्या आहेत. याचबरोबर व्हॉट्सअॅपवर स्टिकर फिचरही देण्यात येणार आहे.


स्टिकरही लावण्यात येणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅपवर आत्तापर्यंत व्हिडिओ कॉलिंगचं फिचर होतं पण आता ग्रुप कॉलिंगचं फिचर लॉन्च होईल. तसंच व्हॉट्सअॅपवर स्टिकरचं फिचरही देण्यात येईल. स्टिकरचं फिचर याआधी फेसबूक मेसेंजर आणि हाईक या मोबाईल अॅपवर उपलब्ध होतं. व्हॉट्सअॅप स्टेटस या फिचरचा वापर 45 कोटींपेक्षा जास्त यूजर्सनी केला आहे. दिवसाला 2 अरब लोकं व्हॉट्सअॅप वापरतात, अशी माहिती झुकेरबर्ग यांनी दिली आहे.


काय असतं ग्रुप कॉलिंग?


ग्रुप कॉलिंगच्या फिचरमुळे एकाचवेळी अनेक जणांना कॉल करता येऊ शकतो. स्काईपसारखीच ग्रुप कॉलिंगची सुविधा आता व्हॉट्सअॅपवर मिळेल. सध्या हे फिचर ऍन्ड्रॉईड फोनवर उपलब्ध होईल. या अॅपवरून एकावेळी तीन का चार जणांना व्हिडिओ कॉलिंग करता येईल, याबाबत मात्र अजूनही झुकेरबर्गनं माहिती दिलेली नाही.


ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार


आतापर्यंत  व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिनला जास्त अधिकार होते. त्यांचे ग्रुपवर खूप नियंत्रण होते. ते लोकांना ग्रुपमध्ये अॅड करु शकत होते. रिमूव्ह करु शकतात. पण ग्रुपचे नाव, आयकॉन बदलण्यावर अॅडमिनचे नियंत्रण नव्हते. ग्रुपमधील कोणताही सदस्य ते करु शकत होता. त्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागत होते.


आता अॅडमिनच्या अधिकारात बदल होणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या 2.18.132 व्हर्जनमध्ये हे बदल दिसून येतील. अॅडमिनला आता नवीन ग्रुप सेटिंग ऑप्शन्स ग्रुप इंफो पेजवर दिसतील. त्यावर टॅप केल्यास नवीन पेज ओपन होईल. त्यात  editing the group’s info आणि change the group’s admins असा ऑप्शन दिसेल. त्यात all participants आणि only admin असे पर्याय दिसतील.