मुंबई : दररोज ऑनलाइन फसवणुकीची नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि त्यातील नवीनच प्रकरण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंग. हॅकर्स लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार यूपीमधील लखनऊमधून समोर आला आहे. जिथे नेहा मोहन सिन्हाची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा UPI व्यवहारांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरते. अचानक तिच्या संपर्कात असलेल्या लोकांनी फोन करून करून तिला पैसे का हवेत, अशी विचारणा केली. तेव्हा तिला धक्काच बसला. ती म्हटली की मी पैसे मागितलेच नाही. 


तोपर्यंत तिच्या एका मित्राने हॅकर्सना नऊ हजार रुपयेही पाठवले होते.


हॅकर्सकडून फसवणूक 


हॅकर्स टेलिकॉम कंपनीचे एक्झिक्युटिव्ह बनून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. हॅकर्सनी नेहाचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट फसवणूक करून हॅक केले. ही एकचच घटना नसून गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.


अनेक लोकांची खाती हॅक 


दोन वरिष्ठ डॉक्टर आणि KGMUच्या एका प्राध्यापकाचे व्हॉट्सअॅप अकाउंटही हॅक करण्यात आले आहेत. हॅकर्सनी त्यांच्या संपर्कांना मेसेज करून पैसे मागितले आहेत. गेल्या एका महिन्यात लखनौमधून व्हॉट्सअॅप हॅकिंगची 10 प्रकरणे समोर आली आहेत.


इंटरनेट स्पीड वाढवण्याच्या नावाखाली हॅकिंग


इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी तो वापरकर्त्यांना *401* हा नंबर डायल करण्यास सांगतो. यानंतर 10 मिनिटांच्या आत, वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप पिनचा संदेश येतो आणि त्यांचे खाते लॉग आउट होते. वापरकर्त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांचे खाते हॅक झाले असते.


हॅकर्स युजर्सच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवतात आणि यूजर्सच्या नावाने पैसे मागतात. तुम्हालाही असा काही फोन आला तर सावध राहा आणि चुकूनही अशा लोकांच्या फंदात पडू नका.