मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या यूझर्ससाठी काही ना काही नवीन फीचर आणत असताता आणि आपल्या यूझर्सना खूश करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुऴेच व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सगळ्यात जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्ससाठी आता नवे फीचर लॉन्च करत आहे. हा Voice फीचर आहे. यामध्ये यूझर्स Voice मॅसेजची प्ले बॅक स्पिड वाढवू शकतात. फास्ट प्लेबॅक फीचर अंतर्गत Voice चा पिच न बदलता डिफॉल्ट 1 सेटिंग ठेवल्यास प्लेबॅक मॅसेजची स्पिड 1.5 किंवा 2 पटीने वाढते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हे फीचर वापरणे अगदी सोपे आहे. कारण जेव्हा तुम्ही Voice (WhatsApp Voice Message) मॅसेजला प्रेस करुन त्याला प्ले करता, तिथे तुम्हाला प्लेबॅक, स्पिड दिसेल, जी डीफॉल्टनुसार 1 पट सेट केली जाईल. तुम्ही प्लेबॅकच्या स्पिडला टच करुन, त्या Voice मॅसेजचा स्पिड दीड किंवा दोन पट वाढवू शकता.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, फास्ट प्लेबॅकला लॉन्च करताना व्हाट्सएपने; फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक छोटा व्हीडिओ शेअर केला आहे. अ‍ॅपच्या या नवीन वैशिष्ट्यामुळे, आता यूझर्सना लांब आणि मोठ्या Voice मॅसेज ऐकण्यासाठी जास्त वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही.


आता व्हॉट्सअ‍ॅपने बिझिनेस यूझर्ससाठीही काही तरी खास आणले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, बिझिनेस यूझर्स सहजपणे स्टिकर शोधू शकतील. WABetaInfoच्या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) अँड्रॉइड बीटा यूझर्ससाठी सर्च फॉर स्टिकर्स शॉर्टकट फीचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सच्या लेटेस्ट 2.21.12.1 वर्जन व्हॉट्सअ‍ॅप बीटा यूझर्सना स्टिकर्ससाठी कीबोर्ड शॉर्टकट देण्यात आले आहे. सध्या स्टिकर्स सर्च ऑफ व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन चाचणीच्या टप्प्यात आहे.


व्हॉट्सअ‍ॅप छोट्या आणि मध्यम बिझिनेस यूझर्सला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढण्यासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म ठरु शकेल. यामध्ये बिझिनेससाठी थेट फेसबुक वरून मदत दिली जाईल. व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस आता अनेक प्रकारच्या मॅसेजेसना समर्थन देईल. यासह एखादी वस्तू कधी स्टॉकमध्ये आली, हे देखील लोकांना सहज कळण्यास मदत होईल.