व्हॉट्सअॅपचं रूप `या` मोबाईलमध्ये लवकरच बदलणार
फेसबुकचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप लवकरच नव्या स्वरूपात दिसणार आहे.
मुंबई : फेसबुकचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप लवकरच नव्या स्वरूपात दिसणार आहे.
व्हॉटअॅपच्या अॅन्ड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी नवं अपडेट रिलीज करण्यात आलं आहे. अॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनमध्ये 2.18.74साठी व्हॉट्सअॅपने अडॅप्टर लॉन्चर आयकॉन आणला आहे. हे अडाप्टीव्ह आयकॉन फीचर अॅन्ड्रॉईड ओरियो ऑपरेटिंग सिस्टमचा भाग आहे. व्हॉट्सअॅपच्या जुन्या आयकॉनप्रमाणेच नवा आयकॉन असेल.
तुमच्या आवडीनुसआर आकार
गॅजेट्स नाऊने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, व्हॉटसअॅपचा नवा आयकॉन एका मास्कमध्ये आहे. त्याला तुम्ही आवडीनुसार हव्या असनार्या आकारामध्ये ठेवू शकता. चौकोन, वर्तुळ टीयर ड्रॉप अशा वेगवेगळ्या आकारामध्ये हा आकार निवडला जाऊ शकतो. त्यामुळे अॅन्ड्रॉईडच्या युजर्सना व्हॉट्सअॅपचा नवा लूक पाहता / निवडता येणार आहे.
बीटा व्हर्जन होणार डाऊनलोड
व्हॉट्सअॅपचं अपडेट तुम्हांला न मिळाल्यास त्यासाठी गूगल प्ले स्टोअरमधून बीटा व्हर्जन डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने भारतामध्ये यूपीआयवर आधारित पेमेंट फीचर लॉन्च केलं आहे. हे फीचर काही ठराविक अॅन्ड्रॉईड आणि आयओएस यूजर्सना मिळणार आहे. सोबतच व्हॉट्सअॅपच्या युजर्सना स्पॅम मेसेजपासून सुटका मिळणार आहे. या करिता खास फीचरचं टेस्टिंग करण्यात आलं आहे.
फॉरवर्ड मेसेजपासून सुटका
सकाळ -संध्याकाळ 'गुड मॉर्निंग' , 'गुड नाईट' अशा मेसेजने अनेकजण हैराण झालेले असतात. मात्र लवकरच अशा मेसेजपासून युजर्सची सुटका होणार आहे.
मेसेज कोणी टाईप केला आहे ? याची माहितीदेखील आता ग्राहकांना मिळणार आहे. जर मेसेज फॉरवर्ड केलेला असेल तर त्याची माहिती 'Forwarded Message'अशी दिली जाते.