मुंबई: जगातील सर्वात उत्तम आणि सोपं संवाद साधण्याचं माध्यम म्हणजे Whatsapp. अगदी साध्या छोट्या गोष्टीपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत महत्त्वाचे फोटो आणि डॉक्युमेंट पाठवायचे असेल तर Whatsappवर अगदी सहज पाठवता येतात. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत Whatsapp वर फोटो पाठवले तर त्याची क्वालिटी चांगली येत नव्हते म्हणजेच क्विलिटी खराब व्हायची. हीच समस्या आता Whatsappने लक्षात घेऊन त्यासंदर्भात नवीन फीचर आणलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Whatsapp च्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो  पाठवता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. आता व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन येत आहे. ज्यामध्ये युझर्सना फोटोंसाठी 3 पर्याय दिले जातील. 


या फीचरमध्ये ऑटो, बेस्ट आणि डेटा सेव्हर असे तीन पर्याय असणार आहेत. फोटो पाठवताना आपण या तिघांमधून आपल्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची मुभा असणार आहे. त्यानंतर आपण त्याच गुणवत्तेत तो फोटो दुसऱ्या युझरपर्यंत फोटो पाठवू शकता. 


Chat ओपन न करता वाचता येणार मेसेज
समोरच्या व्यक्तीने केलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहिल्यानंतर आपोआप त्या मेसेज खाली डबल ब्लू टीक येते. ज्यातून तो मेसेज पाहिल्याचं सूचित होतं. पण या फीचरनुसार आता मेसेज  सीन केल्यानंतरही समोरच्याला ब्लू टीक दिसणार नाही. 


विशेष म्हणजे रीड रिसिप्ट ऑन असल्यानंतरही मेसेजला ब्लू टीक दिसणार नाही. जर एखाद्या यूझरने नोटिफिकेशनद्वारे आलेल्या मेसेजला रिप्लाय केला, तर सर्व ग्रे टीक ब्लूमध्ये बदलतील.