WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; अडचणी दूर करणार `हे` नवं फिचर
सध्याचा सेटअप केवळ यूजर्सला मेसेज डिलीट करण्याची सुविधा देतो
मुंबई : WhatsApp चा वापर सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आहे. सरकारी-प्रायवेट ऑफिस, शाळा-कॉलेज, कौटुंबीक ग्रुप असो की मित्र-मैत्रिणींचे ग्रुप. या न त्या निमित्ताने प्रत्येकजण WhatsApp वापरत असतो.
मुख्य म्हणजे सर्वच स्तरांमध्ये होणारा या अॅपचा वापर पाहता, त्यामध्ये सातत्यानं काही नवनवीन फिचर्स आणले जात आहेत. आता नव्यानं या अॅपमध्ये आणखी एक फिचर जोडलं जात आहे.
हे फिचर Chatting शी संबंधित असणार आहे. या फिचरमध्ये पाठवलेला मेसेज एडिट करता येणार आहे. WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये पाठवलेल्या मेसेज एडिट करण्याची सोय देण्यात येणार आहे.
WhatsApp देणार मेसेज एडिट करण्याची सोय
साधरणत: पाच वर्षांपूर्वी WhatsApp नं या फिचर संदर्भात काम सुरु केलं होतं. परंतू ट्विटरवर याची माहिती मिळताच या फिचरवर काम करायचे बंद केले. शेवटी, पाच वर्षांनंतर का होईना पण WhatsApp या फिचरवर काम करण्याचा विचार केला आहे.
कसं काम करेल हे फिचर?
आपण पाठवलेला मेसेज जेव्हा सिलेक्ट करु तेव्हा WhatsApp एडिटचा ऑप्शन दिला जाणार आहे. मेसेजला कॉपी आणि फॉरवर्ड ऑप्शन्सच्या सोबतच, यूजर्सला एक नविन Edit ऑप्शन सुद्धा मिळणार आहे.
सध्याचा सेटअप केवळ युजर्सला मेसेज डिलीट करण्याची सुविधा देतो परंतु तुम्ही त्याला एडिट शकत नाही.
नविन फिचरची टेस्टिंग सुरु
अॅड्रॉइडच्या व्हाट्सएप बीटावर या नविन फिचरवर काम सुरु आहे. परंतु, रिपोर्ट नुसार व्हाट्सएप iOS आणि डेस्कटॉपसाठी वॉट्सएप बीटामध्ये हे एक फीचर आणण्यासाठी काम सुरु आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार आहे.