मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्ससाठी नवनवीन फीचर्सच्या बाजारात आणत असतो. यामुळे  व्हॉट्सअ‍ॅप केवळ आपल्या यूझर्सनाच अ‍ॅगेज करुन ठेवत नाही, तर तो बाजारातील त्याच्या कॉम्पीटेटर्सना देखील नव नवीन आव्हान देत असतो. तसे पाहाता बाजारात व्हॉट्सअ‍ॅपच्या जवळपास बरोरीचे कोणते ही चॅटींग अ‍ॅप नाही. व्हॉट्सअ‍ॅपने आता एक नवीन फीचर आणले आहे. ज्याचे नाव View Once आहे. WABetaInfo  च्या अहवालानुसार हे फीचर नुकतेच अ‍ॅप बीटाच्या अँड्रॉइड यूझर्ससाठी सादर करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर WABetaInfoने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, युझर्स फोनच्या गॅलरीतूनच हा अदृश्य होणारा फोटो पाठवू शकतील. यासाठी, फोटो निवडल्यानंतर, यूझर्सना watch सारखं एक चिन्ह दिसेल, ज्यावर तुम्हाल टॅप करावे लागेल. समोरच्याला फोटो पाठवताना तुम्हाल हा पर्याय कॅप्शन बार जवळ दिसेल.


- View Once mode फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सने प्रथम माध्यम निवडले पाहिजे, त्यानंतर watch सारखे चिन्हावर टॅप करावा लागेल. हे 'Add a caption'  बारच्या जवळ उपलब्ध असेल.


जेव्हा प्राप्तकर्ता हा मॅसेज उघडेल, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप पाठवणार्‍याला (sender) सूचित करेल.


- एकदा मीडिया उघडल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप प्राप्तकर्त्यास पुढील संदेश दर्शवेल: "हा फोटो एक-वेळ पाहण्यासाठी सेट केला आहे. अधिक गोपनीयतेसाठी, आपण हा फोटो बंद केल्यानंतर हा फोटो अदृश्य होईल"


परंतु त़ुम्हाला हे फीचर तुमच्या फोनमध्ये घेण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. हे फीचर वापरण्यासाठी यूझर्सना त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन नंबर 2.21.14.3 वर अपडेट करावा लागेल.


WABetaInfoच्या मते, यूझर्सनी read receipts बंद ठेवला असला तरी, View Once फीचरमध्ये पाठविलेला फोटो उघडताना प्राप्तकर्ताने फोटो पाहिला आहे की, नाही हे Sender ला समजेल. तसेच, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये असे फोटो पाठवत असाल तर, तुमच्या ग्रुपमधील उपस्थित सदस्यांनी तो फोटो उघडल्यावर तुम्हाला ते कळेल.