WhatsAppवर आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य
इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अॅप आले आहे. या अपडेटनंतर तुम्ही आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे.
मुंबई : इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अॅप आले आहे. या अपडेटनंतर तुम्ही आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे.
यापूर्वी व्हॉट्सअॅपने पीडीएफ फाइल पाठविण्याचे फिचर दिले होते. त्यात 100MB ची फाइल पाठवता येते. सुरूवातीला व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारची फाईल पाठविण्याचे फिचर नव्हते. पण हळूहळू कंपनीने फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओसह पीडीएफ फाइल्स शेअरिंगला सुरूवात केली.
पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएलएस सारख्या फाइल पाठविण्याचे ऑप्शन आहे. त्यामुळे सर्व फाइल फॉरमॅट व्हॉट्सअॅपद्वारे पाठविता येणार आहेत.
रिपोर्ट्स नुसार iOS यूजर्स 128MB पर्यंत फाइल सेंड करता येणार आहे. तर अँड्रॉइड युजर्स 100MB ची लिमीट आहे. तर व्हॉट्सअॅप वेबसाठी केवळ 64 MB पर्यंत फाइल्स पाठवता येणार आहे.
नव्या अपडेटने तुम्ही अॅपसुद्धा व्हॉट्सअॅपद्वारे कोणालाही पाठवू शकतात. तसेच या अपडेटमध्ये दुसरा फिचर जोडण्यात आला आहे. त्यात कॅमरा स्क्रिनवरून फोटो आणि व्हिडिओ सेलेक्ट करू शकतात.
नुकतेच व्हॉट्सअॅपने फोटो फिल्टर ऑप्शन दिला आहे. त्यात तुम्ही फोटो पाठवताना फिल्टर्स लावू शकतात.