व्हॉट्स अॅप बंद करणार हे फीचर
व्हॉट्स अॅप हे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
मुंबई : व्हॉट्स अॅप हे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
मात्र आता लवकरच व्हॉट्स अॅप त्यांचे एक लोकप्रिय फीचर बंद करण्याचा विचार करत आहे. सध्या या वबाबतची टेस्टिंग सुरू असल्याची माहिती @WABetaInfo या ट्विटर हॅन्डलने दिली आहे.
पूर्वी युजर नेम टाकताना तुम्ही त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर किंवा इमोजीचा वापर करू शकत होता मात्र आता तुम्हांला केवळ तुमचे नाव लिहण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वीही सिक्युरिटीमध्ये बदल करताना व्हॉट्स अॅपने संदेश वाचाण्याची संधी केवळ पाठवणार्याला आणि संदेश मिळणार्या व्यक्तीला
मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त कोणतीही संस्था हा मेसेज वाचू शकणार नाही.
सध्या व्हॉट्स अॅप त्यांच्या फीचर्समध्ये अनेक बदल करत आहेत. लवकरच सर्च इमोजी ऑप्शन,फॉन्ट स्टाईल, गुगल ड्राईव्ह वर चॅटचा बॅक अप, तसेच आवश्यक असणार्या मेसेजलाही बुकमार्क करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.