मुंबई : अनेकांच्या जिव्हाळ्याचं बनलेल्या 'व्हॉटसअप'ची सुरक्षा पॉलिसी युझर्सची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी नसल्याचं उघड झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 व्हॉटसअपनं आपल्या जगभरातील करोडो युझर्ससाठी एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन लागू कले्यानंतरही इन्स्टंट मॅसेजिंग अॅपच्या नीतीमध्येच त्रुटी असल्याचं समोर आलंय. ही गोष्ट डिजीटल अधिकार समूहाच्या नव्या रिपोर्टमध्ये सांगितली गेलीय. 


इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या 'कौन आपके पीछे है' नावाच्या वार्षिक रिपोर्टमध्ये, अॅपल, फेसबुक आणि गूगल आपल्या यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी संपूर्णत: उभे राहू शकतील, असं देखील म्हटलंय.


परंतु, व्हॉटसअपनं हे स्पष्ट केलेलं नाही की त्यांच्या युझर्सचे आकडे तिसऱ्या पक्षापर्यंत पाहचण्यापासून ते सुरक्षित ठेवतात, किंवा तिसऱ्या पक्षाला यूझर्सचा डाटा निगरानीच्या उद्देशानं वापरण्यास मनाईही यामध्ये केली गेलेली नाही. 


उल्लेखनीय म्हणजे, भारतात व्हॉटसअपचे जवळपास २० करोड यूझर्स आहेत.