Whatsapp Sextortion: मोबाईल (Mobile) हातात आल्यानंतर त्याचा वापर तुम्ही कसा करता हे तुमच्याच हातात असतं. बऱ्याचदा तर असं होतं की हा फोन वापरून आपण इतके वैतागतो की त्याच्याकडे पाहायचीसुद्धा इच्छा होत नाही. यातूनच पुढे मग स्पॅम कॉल्स (Spam Calls) ओळखून त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण, व्हॉट्सअप कॉल (Whatsapp Call ) आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते. कारण, सध्या (Sextortion) सेक्सटॉर्शनचं प्रकरण फोफावताना दिसत आहे. (WhatsApp Scam Fraud Sextortion trap through video)


सेक्सटॉर्शन (Sextortion) प्रकरणात नेमकं काय होतं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही व्यक्तींनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराविषयी माहिती देत सांगितलं, त्यांना सुरुवातीला काही Call आले. बऱ्याचदा असं झालं की त्या फोनकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण, नंतर मात्र सलग दोन-तीन वेळा Video Call आल्यामुळे सदर व्यक्तींनी ते Receive केले. 


पुन्हा एका वेगळ्या क्रमांकावरून फोन आला आणि तो उचलल्यानंतर समोरून पैशांची मागणी करण्यात आली. फोन करणारी ही मंडळी युजरच्या फुटेजचा एक व्हिडीओ (Video) बनवतात, ज्यामध्ये फोन उचलणारी व्यक्ती चुकीच्या कामांमध्ये सहभागी आहे असं वाटतं. या संपूर्ण प्रकरणाला सध्या सेक्सटॉर्शन असं नाव देण्यात आलं आहे. 


अधिक वाचा : MS Excel: कम्प्युटरवर तासांचं काम होणार मिनिटांत, फक्त हे शॉर्टकट माहित असले पाहिजे


 


प्रतिमा मलिन होण्याची भीती किंवा आणखी काही. पण, बरेचजण यासंदर्भातील माहिती पोलिसांना देत नाहीत. उलटपक्षी फसव्या व्यक्तींना तर काहीजण पैसे देण्यासाठी तयार होतात. अनेकजण भीतीपोटी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करतात, तर काही नंबर ब्लॉक (Block Numbers) करतात. 


फसव्या फोन कॉलपासून कसं वाचायचं? 


पोलिसांच्या (Police) माहितीनुसार फसवणूक करणारी मंडळी अतिशय हुशारीनं अशाच व्यक्तींना निशाण्यावर घेतात ज्यांना गंडा घालणं सोपं असेल. या मंडळींना ट्रॅक करणंही फार कठीण आहे. एका राज्यातून ही मंडळी दुसऱ्या राज्यात असणाऱ्या व्यक्तीची फसवणूक करतात. यासाठी वेगवेगळ्या क्रमांकांचा वापर करतात. 


अधिक वाचा : आत्ताच्या आता डिलीट करा हे 4 धोकादायक अ‍ॅप्स, नाहीतर डेटा लिक झालाच समजा


 


सेक्सटॉर्शनची एकंदर प्रकरणं आणि त्याचे परिणाम पाहता सध्या सायबर सेलकडूनही मोबाईल धारकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. दर दिवशी एका नव्या पद्धतीनं ही मंडळी लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळं अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास पहिल्या वेळेस फोन उचलू नये. गरज असल्यास समोरील व्यक्ती दुसऱ्यांदा फोन करेल. 


पहिल्या वेळेसच अनोळखी क्रमांकावरून (Unknown Number) आलेला फोन तुम्ही उचलला आणि समोरच्या व्यक्तीनं थेट संवाद साधण्यास सुरुवात केली तर त्यांना काय हवंय ते आधी ऐकून घ्या. त्यानं उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यास हा Call record करा आणि फोन ठेवून द्या. पुढच्या क्षणाला थेट पोलिसांत जाऊन सदरील प्रकरणी तक्रार दाखल करा. चुकीनही तुमच्या बँक अकाऊंट (Bank Account) किंवा सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटची माहिती या व्यक्तीपर्यंत पोहोचू देऊ नका. कोणत्याही प्रकारची सविस्तर माहिती चुकूनही Share करु नका.