WhatsApp Tricks | कोणाचेही चॅट न उघडता, वाचू शकता मॅसेज; या ट्रिक वापरा
अनेकदा असे होते की, तुम्हाला मॅसेजतर वाचायचा असतो परंतु त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करू इच्छित नाही.
मुंबई : अनेकदा असे होते की, तुम्हाला मॅसेजतर वाचायचा असतो परंतु त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करू इच्छित नाही. तसे तर तुम्ही नोटिफिकेशन पॅनलमध्ये जाऊन स्कोल करू शकता. परंतु त्याशिवाय देखील भन्नाट पर्याय आहेत. ज्यामुळे तुम्ही विना चॅट ओपन करता. पूर्ण मॅसेज वाचू शकता.
जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
1 आपल्या होम स्क्रिनवर लॉंग प्रेस करा. त्यानंतर एक मेन्यु पॉप अप होईल.
2 आता Widges वर जाऊन क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे शॉर्टकर्ट्स मिळतील. यानंतर तुम्हाला व्हाट्सअपचे शॉर्टकर्ट शोधावे लागेल.
3 आता तुम्हाला अनेक प्रकारे व्हाट्सअप Widges दिसून येतील. त्यानंतर तुम्हाला "4*1 WhatsApp" ला टच करायचे आहे.
4 Widges ला टच करा आणि होल्ड करा. आणि आपल्या होम स्क्रिनला घेऊन या. होम स्क्रिनवर आणल्यानंतर लॉंग प्रेस करून तुम्ही त्याला एक्पॅड करू शकता.
आता तुम्ही व्हाट्सअपवरचे सर्व मॅसेज वाचू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही चॅट ओपन करण्याची गरज नाही. येथे लक्षात घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की, तुम्ही Widges वर कोणतेही चॅट उघडले तर, मॅसेज पाठवणाऱ्याला कळेल की, तुम्ही मॅसेज वाचला आहे.
WhatsApp Web वर देखील तुम्ही मॅसेज पाठवणाऱ्याला न कळता मॅसेज वाचू शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या WhatsApp Web वर जा. त्यानंतर संबधीत चॅटवर फक्त कर्सर घेऊन जा. तुम्हाला तो मॅसेज चॅट न ओपन करता वाचता येईल.