मुंबई : लाखो भारतीय व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. यामध्ये, वापरकर्ते चॅट करू शकतात त्याचप्रमामे यामधून ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल देखील आपण करु शकतो. व्हॉट्सअ‍ॅप आपले यूझर्स टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या फीचर नेहमीच अपडेट करत असतं. त्याचबरोबर युझर्स देखील व्हॉट्सअ‍ॅपवर काही ना काही युक्त्या शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी यूझर्सना माहिती नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा लोक व्हॉट्सअ‍ॅपवर अनावश्यक मेसेज डिलीट करतात किंवा त्यांच्याकडून चूकून डीलिट होतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, की असे मॅसेज पुन्हा हवे असेल तर ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका युक्तीबद्दल सांगणार आहोत.


तसे पाहाता व्हॉट्सअ‍ॅपवर असे कोणतेही वैशिष्ट्य नाही, ज्याद्वारे तुम्ही डीलिट केलेले मेसेज पाहू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवरील डीलिट केलेले मेसेज पुन्हा वाचता येणार नाहीत. परंतु एखादा महत्वाचा मेसेज डीलिट झाला आहे आणि तुम्हाला तो पुन्हा वाचायचा आहे, तर तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप वापरावा लागेल.


हटवलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश असे वाचावेत
1. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसॅजेस वाचायचे असतील, तर तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप WhatsRemoved+डाउनलोड करावे लागेल.
2. Play Store वरून WhatsRemoved+ इंस्टॉल करा. त्यानंतर त्याच्या अटी आणि शर्ती स्वीकारा.
3. अ‍ॅप वापरण्यासाठी, आपल्याला सूचनांमध्ये त्याला प्रवेश द्यावा लागेल.
4. त्यानंतर ज्या अ‍ॅप्लिकेशनच्या सूचना तुम्हाला सेव्ह करायच्या आहेत त्या निवडा.
5. त्यानंतर WhatsApp सक्षम करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.


तुमचं प्रायवेट whatsapp Chat कुणीतरी पाहायत, आताच सावध व्हा


6. त्यानंतर जेव्हा तुम्ही पेजवर जाता, तेव्हा डिलीट केलेले संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर दाखवले जातील.
7. स्क्रीनच्या शीर्षस्थानी सापडलेल्या पर्यायाजवळ व्हॉट्सअ‍ॅप चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
8. ते सक्षम केल्यानंतर, तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचू शकाल.


ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅप अशी कोणतीही सुविधा देत नाही. जर तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप सुरक्षित वाटत नसेल आणि त्याला धोका वाटत असेल तर ते इन्स्टॉल करू नका.